Shiv sena
Shiv sena

महामार्गाचे काम निकृष्ट व संथगतीने; शिवसेनेचा रास्ता रोको

महामार्गाचे काम निकृष्ट व संथगतीने; शिवसेनेचा रास्ता रोको
Published on

पारोळा (जळगाव) : राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट दर्ज्याचे सुरु आहे. सद्यस्थितीत अजंग ते तरसोद ह्या टप्प्यात नव्या व जुन्या दोन्ही महामार्गांवर रस्त्याला खोलवर मोठे खड्डे पडलेले आहेत. महामार्गाच्‍या कामाबाबत शिवसेनेने आज रास्‍ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावर दोन्‍ही बाजूंनी रहदारी थांबली होती. (jalgaon-news-Highway-work-inferior-and-slow-Stop-Shiv-Sena's-way-parola-baipass)

खराब रस्त्यावर किंवा काम सुरु असल्याचा बऱ्याच ठिकाणी सूचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह देखील लावलेले नाहीत. त्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून सदरील कामाला गती मिळावी, रस्त्यावर पडलेले खोलवर खड्ड्यांना तात्काळ उच्च दर्जाच्या कामाने डागडूगी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी महामार्गाच्या बायपास रस्त्यावर रास्ता रोको करुन महामार्गाच्या सुरु असलेल्या निष्क्रिय कामाचा निषेध व्यक्त केला.

गेल्या वर्षापासुन महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र कामाला गती न मिळणे कामात क्लाँलिटी नसणे, याबाबत संबंधित अधिकार्यांना वारंवार सुचना करुन देखील ते चालढकल करित आहेत. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. विचखेडे गावाजवळील बाभोटी नाल्याजवळ खोलवर खड्ड्यामुळे दोन बैल दगावली. यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले. हायवेलगत असलेल्या शेतकर्यांना आज देखील मोबादला मिळाला नसल्याने आपण हे आंदोलन करत असुन महामार्गाचे काम वेळेवर पुर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने पुन्हा आपण रस्त्यावर उतरु असा इशारा आमदार चिमणराव पाटील यांनी दिला. उपरोक्त मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात येईल असे लेखी निवेदन यावेळी नही प्रा.लि.चे अधिकारी अरूण सोनवणे, पंकज प्रसाद, दिग्वीजय पाटील, प्रदीप त्रीवेदी, अनुपकुमार श्रीवास्तव, नंदकुमार जोशी, शशी जोशी यांनी सह्यानिशी दिले.

Shiv sena
पर्यावरणाचा संदेश देत झाडाच्या फांदीत गणरायाची प्रतिष्ठापना

एक तास आंदोलन

महामार्गाच्या संबंधित अधिकार्यांनी कामास गतीमानता व चांगले प्रकार करण्याचे लेखी आवाहन दिल्याने तब्बल एक तास सुरु असलेले आंदोलन थांबविण्यात आले. यावेळी कृऊबा समितीचे सभापती अमोल पाटील, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा शहरप्रमुख अशोक मराठे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विवेक माळी, एरंडोल शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेना पारोळा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख बबलु पाटील, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, तहसिलदार अनिल गवांदे आदींसह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिवसैनिक आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com