दिल्लीतील दगडफेक प्रकरणी चौथा FIR दाखल; गोळीबार करणारा आरोपी अटकेत

दिल्लीत जहांगीरपुरी भागामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांकडून वेगवान तपास आणि कारवाई सुरु
Delhi Violence
Delhi ViolenceSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: दिल्लीत जहांगीरपुरी भागामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांकडून वेगवान तपास आणि कारवाई सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौथा एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. सोमवारी पोलिसांनी आरोपी सोनू चिकना याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. सोनू चिकनावर दगडफेकीवेळी गोळीबार (Firing) केल्याचा आरोप आहे. दगडफेक आणि तोडफोडीचा व्हिडीओ (Video) व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक व्यक्ती गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला होता.

हे देखील पहा-

यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनू चिकनाचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत २२ आरोपींना पोलिसांनी अटक (Arrested) केले आहेत. या २२ व्यतिरिक्त आणखी २ अल्पवयीन मुलांना देखील अटक करण्यात आली आहे. आरोपी सोनू चिकनाची अटक सर्वात महत्त्वाची असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्याचे वर्णन कुख्यात गुन्हेगार असे केले आहे. पहिली एफआयआर १६ एप्रिल दिवशी नोंदवण्यात आली होती. यामध्ये विविध गुन्हेगारी कलमांखाली खटला चालवण्यात आला आहे.

दुसऱ्या एफआयआरमध्ये परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमा या आरोपी विरोधात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी तिसरी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ज्या शस्त्राने सोनू गोळीबार करताना दिसत आहे. त्याच शस्त्रासह सोनू चिकना याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. सोनू शेख उर्फ ​​सोनू चिकना याला आज रोहिणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सोनू चिकनाच्या अटकेसह आतापर्यंत एकूण २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अन्सार, अस्लम, जाहिद, शहजाद, मुख्त्यार अली हसन, मोहम्मद अली, अमीर, अक्सर, नूर आलम, जाकीर, अक्रम, इम्तियाज, अहिर, मोहम्मद अली, शेख सौरभ, सूरज, नीरज, सुकेन, सुरेश, सुजित सरकार आणि सलीम चिकना उर्फ सोनू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या २२ व्यतिरिक्त २ अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. सोमवारी ८ सदस्यांच्या पथकाने हिंसाचाराच्या ठिकाणाहून नमुने गोळा करण्यात आले आहेत. हिंसाचाराचा आरोप असलेल्या अन्सारचे आम आदमी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Delhi Violence
"दंडेलशाहीला दंडेलशाहीनं उत्तर देऊ"- प्रवीण दरेकरांचा इशारा

या आरोपांवर दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले आहे की, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोणी देखील पक्षाची टोपी घालू शकतो. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, सरकारच्या इशाऱ्यावर हिंसाचार होत आहे. सरकारला हवे असते तर हिंसाचार झाला नसता. पोलिसांची कारवाई एकतर्फी आहे. एफआयआरनुसार, संध्याकाळी ६ वाजता मिरवणूक जामा मशिदीजवळ पोहोचताच अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या ४ ते ५ साथीदाराबरोबर आला आणि मिरवणुकीमध्ये सहभागी लोकांशी वाद घालू लागला होता. बाचाबाची वाढत गेल्यामुळे परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. यानंतर रस्त्यांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली. लाठ्या, तलवारी घेऊन लोक रस्त्यावर आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com