"दंडेलशाहीला दंडेलशाहीनं उत्तर देऊ"- प्रवीण दरेकरांचा इशारा

पुढील अर्ध्या तासात कारवाई झाली नाहीतर...
Praveen Darekar Latest News Updates, Poll Khol Rally News Updates
Praveen Darekar Latest News Updates, Poll Khol Rally News UpdatesSaam Tv
Published On

मुंबई: महापालिकेत भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून आजपासून पोलखोल अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअगोदरच भाजपच्या पोलखोल रथाची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आले आहेत. ही तोडफोड महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप भाजपचा (BJP) आहे. आता या घटनेवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर भाजपच्या प्रविण दरेकर (pravin darekar) यांनी दंडेलशाहीला दंडेलशाहीने उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. गुंडप्रवृत्ती हाताशी धरून पोल खोल आंदोलन दाबण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार सध्या करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. (Praveen Darekar Latest News Updates)

हे देखील पहा-

याप्रकरणी पुढील अर्ध्या तासात कारवाई झाली नाही, तर पोलिस (Police) स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी ते म्हणाले आहेत की, आज भाजपच्या वतीने मुंबईत पोलखोल अभियान सुरु केले आहे. त्याचा समारोप सायनला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत होणार आहे. कालपासून सुरु झालेल्या या अभियातून मुंबई महापालिकेत (Municipal Corporation) होत असलेला घोटाळा उघड करत आहे. लोकशाही पद्धतीने लोकांसमोर हे आम्ही मांडू शकणार आहे. पण काही गुंडप्रवृत्ती हाताशी धरून आमचे पोल खोल आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा आरोप केला आहे. या मागे शिवसेनेचा हात आहे की काय हे बघण्याची आजिबात गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आरोपीला पकडले नाही तर पोलिस स्टेशनला येऊन आंदोलन करणार आहे.

Praveen Darekar Latest News Updates, Poll Khol Rally News Updates
माझ्यावरती केलेल्या 57 कोटींच्या आरोपांचे पुरावेच नाही- किरीट सोमय्या

पोल खोल आंदोलनाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था बिघडली तर पूर्णपणे सरकार जबाबदार असणार आहे, असे ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, लाखो रुपये खर्च करून पोलिस आयुक्त ऑफिसमध्ये आणि गल्लीबोळामध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. या प्रसंगाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. उद्या वरिष्ठांकडून सूचना आल्यास सीसीटीव्ही खराब असल्याचे सांगण्यात येऊ शकणार आहे. असे काही सापडले तर पोलिस ठाण्यात पोलखोल सभा घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेनेला त्यांचे घोटाळे बाहेर येतील याची भीती आहे. यामुळे सरकार पोलखोल आंदोलनावर बंदी घालत आहे. त्यामुळे मुंबईच्या पोलिस आयुक्तांना इतके सांगणे आहे की, त्यांनी कायदा सुव्यवस्तेवर लक्ष द्यावे. कारण सरकार राजकीय बैठकांमध्ये आणि इफ्तार पार्टींमध्ये व्यस्त आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com