नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) मधे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय कायदेमंत्री अश्विनी कुमार यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. अश्विनी कुमार यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. पक्षाबाहेर राहून देशासाठी अधिक चांगले काम करु शकतो, असे त्यांनी सांगितले. अश्विनी कुमार यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये कायदेमंत्री म्हणून काम पाहिले होते (Former union law minister Ashwani Kumar resigns from Congress wrote letter to Sonia Gandhi).
अश्विनी कुमार यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना लिहिले, "प्रकरणाचा विचार केल्यानंतर, मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या प्रतिष्ठेनुसार मी पक्षाच्या बाहेर राहून राष्ट्रीय कार्य अधिक चांगल्या प्रकारे करु शकतो. 46 वर्षांच्या मोठ्या प्रवासानंतर मी पक्ष सोडत आहे आणि आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी कल्पना केलेल्या उदारमतवादी लोकशाहीच्या वचनावर आधारित परिवर्तनवादी नेतृत्वाच्या कल्पनेने प्रेरित सार्वजनिक कारणाचा सक्रियपणे पाठपुरावा करण्यास उत्सुक आहे."
द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, कुमार यांनी या निर्णयाचे कारण पक्षातील नेतृत्वाचा अभाव असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या दोन पिढ्या काँग्रेसशी संबंधित होत्या. कुमार म्हणतात की, काँग्रेस (Congress) पुन्हा स्वतःला शोधू शकली नाही आणि पतन सुरूच राहिले.
कुमार यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबत झालेल्या वागणुकीबद्दलही काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, 'माजी मुख्यमंत्र्यांचा जाहीर अपमान करण्यात आला आणि हे काँग्रेसच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.' पक्षाचा राजीनामा देताना ते म्हणाले, 'मी आता काँग्रेसशी संबंधित आहे असं मला वाटत नाही.'
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.