Political : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांनी केली नव्या पक्षाची घोषणा; काँग्रेसचा दिला राजीनामा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज नवीन राजकीय पक्षाचे नाव जाहीर केलं आहे.
Amarinder Singh
Amarinder Singh SaamTV
Published On

हरियाणा : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग (Former Punjab Chief Minister Amarinder Singh) यांनी आज नवीन राजकीय पक्षाचे नाव जाहीर केलं आहे. अमरिंदर सिंग यांनी आपल्या नव्या पक्षाचे नाव पंजाब आणि कॉँग्रेस या दोन्ही शब्दांचा वापर करुन ”पंजाब लोक काँग्रेस” असे ठेवले आहे. (Former Punjab Chief Minister Amarinder Singh announces new party)

हे देखील पहा -

सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेसनेते तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्याशी झालेल्या वादानंतर अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. नंतर अनेक दिवस पक्षश्रेष्ठींसह चर्चा करुन देखील कॅप्टन आणि सिद्धू यांच्या राजकीय वादावरती काही तोडगा निघाला नव्हाता. त्यामुळे अखेर नाराज कॅप्टन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आणि आज अखेर त्यांनी आपल्या ”पंजाब लोक काँग्रेस” (Punjab Lok Congress) पक्षाची घोषणा केली.

Amarinder Singh
By-Election : सर्व जागांवरती काँग्रेस विजयी; भाजपसाठी धोक्याची घंटा

दरम्यान पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच पंजाब विधानसभेच्या निवडणुका (Punjab Assembly Elections) होणार असतानाच माजी मुख्यमंत्र्यांनी नव्या पक्षाची स्थापना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना हितकारक काही तोडगा निघाल्यास 2022 च्या निवडणुकांमध्ये भाजप सोबत जागावाटपाचा करार होण्याची मला आशा आहे, असेही अमरिंदर सिंग म्हणाले होते. शिवाय काही दिवसांपुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shaha यांचीही भेट घेतली होती.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com