शिक्षणासाठी 12 वर्षांच्या तुलसीचा संघर्ष ; 1.20 लाखाचे आंबे विकून घेतला स्मार्ट फोन

लॉकडाऊनमुळे देशभरातील विद्यार्थी घरुनच शिक्षण घेत आहेत.
1.20  लाखाचे आंबे विकून घेतला स्मार्ट फोन
1.20 लाखाचे आंबे विकून घेतला स्मार्ट फोन twitter/ @ANI
Published On

जमशेदपूर : कोविड-19 (Covid 19) महामारीमुळे देशभरात लागलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) अनेक लोकांच्या जीवनात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. उद्योग क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रालाही (Education Department) मोठा फटका बसला आहे. मात्र आजही असे बरेच लोक आहेत जे हार मानत नाहीत, जे आपल्या जीवनातल्या आव्हानांना तोंड देत आहेत. जमशेदपूर (Jamshedpur) येथील रहिवासी असलेल्या 12 वर्षीय मुलीची तुलसी कुमारी (Tulsi Kumari) अशीच एक व्यक्ती आहे. जमशेदपुरच्या तुलसी कुमारीने आंबे विकुन स्वतच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन (Smartphone) खरेदी केला आहे. (For education, Tulsi bought a smartphone by selling mangoes worth Rs 1.20 lakh)

1.20  लाखाचे आंबे विकून घेतला स्मार्ट फोन
आदिवासी शेतक-यांना भात लागवडीसाठी प्रतिक्षा पावसाची ..

लॉकडाऊनमुळे देशभरातील विद्यार्थी घरुनच शिक्षण घेत आहेत. पाचवी इयत्तेत शिकणारी तुलसी कुमारी ही देखील घरुनच शिक्षण घेत आहे. मात्र शिक्षणासाठी तिच्याकडे मोबाइल फोन नव्हता. यासाठी ती पूर्वी केनन स्टेडियम जवळील लॉकडाऊन दरम्यान आंबे विकत होती. आंबे विकत असताना तिच्या या संघर्षाची गोष्ट मुंबईतील ‘व्हॅल्यूएबल एड्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला समजला आणि कंपनीने तुलसीचा हा जीवन संघर्ष फलदायी ठरविण्यासाठी तुलसीकडून कंपनीने केवळ 1.20 लाखात डझनभर आंबे खरेदी केले. अशा प्रकारे तुळशी तिचा ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी अँड्रॉइड फोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झाली आहे.

जमशेदपूरच्या स्ट्रॅट माईल रोडवरील आऊट हाऊसमध्ये आपल्या पालकांसह राहणारी पाचवीत शिकणारी तुळशी पूर्वी केनन स्टेडियम जवळील लॉकडाऊन दरम्यान आंबे विकायची. ऑनलाईन अभ्यास पुन्हा सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तिला अॅंडरॉईड मोबाइल खरेदी करण्यासाठी 5000 रुपये कमवायचे आहेत. तिची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल खुपच व्हायरल झाली. लाखो लोकांनी तुलसीला सहानुभूती दर्शवली व्यक्त करण्यास सुरवात केली. मात्र व्हॅल्यूएबल एड्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तिची शिक्षणासाठी सुरु असलेली धडपड पाहुन तिच्याकडून फक्त 1.20 लाखात एक डझन आंबे विकत घेतले. मिळालेल्या पैशातून तिने एक अॅंडरॉईड खरेदी केला. मोबाइल मिळाल्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोरोना महामारीने लागलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दिड वर्षांपासून शाळा बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये वडिलांची नोकरी गेली. या काळात आमच्या कुटुबांने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केला. सरकारी शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरु केले, मात्र ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी स्मार्टफोन नव्हता. मला अभ्यास करायचा होता म्हणून मी आंबे विकायला सुरुवात केली. आता मी आंबे विकुन मिळालेल्या पैशांतून स्मार्टफोन घेतला आहे. आता मी स्वत अभ्यास करेल आणि माझ्या बहिणी रोशनी आणि दिपिका यांनाही शिकवेल, असे तुलसीने म्हटले आहे. विशेष म्हणजे तिन्ही बहिणींचे शिक्षक होण्याचे स्वप्न आहे. कोणताही गरीब शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षिका होऊन गरीब मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे या तिघींचेही स्पप्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com