Floral masks : वधू-वरांसाठी फुलांचा मास्क बनवतोय हा अवलिया

वधू-वरांना स्टायलिश दिसण्यासाठी आणि कोविड -19 (Covid 19) बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एका फूल विक्रेत्याने फुलांचा मास्क बनवला आहे.
Floral masks : वधू-वरांसाठी फुलांचा मास्क बनवतोय हा अवलिया
Floral masks : वधू-वरांसाठी फुलांचा मास्क बनवतोय हा अवलिया
Published On

वृत्तसंस्था

तामिळनाडू : कोरोना काळात मास्क (Mask) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. कोरोना माहामारी (Corona epidemic) सुरु झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क पाहायला मिळत आहेत. पण काहीजण अद्यापही मास्क लावायला तयार नाहीत. ज्यामुळे ते संक्रमाणाला बळी पडत आहेत. पण जर तुम्हाला कोणी फुलांचा मास्क आणून दिला तर, तो तुम्ही लावाल ना. अलीकडे लग्नसमारंभात (Wedding ceremony) विशेषतः वधू आणि वरांना लग्नात मास्क लावणे आवडत नाही. वधू-वर लग्नात चांगले कपडे घालतात, त्यामुळे त्यांना ड्रेससोबत मास्क घालणे आवडत नाही. अशा परिस्थितीत, वधू-वरांना स्टायलिश दिसण्यासाठी आणि कोविड -19 (Covid 19) बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एका फूल विक्रेत्याने फुलांचा मास्क बनवला आहे. (Floral masks for brides grooms)

मदुराईतील मोहन नावाच्या एका फूल विक्रेत्याने कोविड -१९ बद्दल विशेषतः वधू आणि वरांसाठी जागरूकता वाढवण्यासाठी फुलांचा मास्क बनवण्यास सुरुवात केली आहे. त्याने बनवलेले हे फुलांचे मुखवटे अतिशय सुंदर आणि स्टाईलिश आहेत. मोहन वेगवेगळ्या रंगांच्या सुंदर फुलांनी हे मुखवटे बनवतो आणि वधू आणि वरांना देखील त्यांचे हे फुलांचे मास्क आवडत आहेत. सरकारचा आदेश असूनही लोक लग्नात मास्क घालत नाहीत. वधू -वरांना ते घालायला प्रोत्साहित करण्यासाठी मी फुलांचे मुखवटे बनवतो." असे फुलविक्रेता मोहन यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

कोरोनामुळे, आपल्या सर्वांच्या जीवनशैलीमध्ये बरेच बदल झाले आहेत. सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल म्हणजे सर्वांनी घराबाहेर पडताना मास्क घालणे. कोरोना विषाणूच्या बचावासाठी कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. कुठेही जा, पण मास्क लावाच, मग तुम्ही लग्नाला जा, पार्टीला, जा ऑफिस किंवा अगदी शॉपिंगला जात असाल. मास्क आपल्यासाठी सर्वत्र आणि प्रत्येक वेळी आवश्यक बनले आहेत. अशा परिस्थितीत, सरकारचे आदेश असूनही, लोक लग्नात मास्क लावणे आवश्यक मानत नाहीत. लग्न समारंभात बरीच गर्दी जमलेली असते. अशावेळी मास्क हा लावलाच पाहिजे पण लग्नसमारंभात मास्क लावत नाही.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com