पॅरिस: मानवजातीमुळे पर्यावरणाला झालेल्या नुकसानीमुळे पृथ्वीवर विनाश होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) पृथ्वीवर तीव्र पूर (Severe Floods), गोठलेले बर्फाचे डोंगर वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ, प्राणघातक उष्णतेची लाट (Heat-waves) आणि दुष्काळी परिस्थिती शिगेला पोहोचतील. असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालात हवामानाबद्दल देण्यात आला आहे. 2030 पर्यंत ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) 1.5 डिग्री सेल्सियसच्या जवळ पोहोचू शकते. आपण जरी जीवाश्म इंधनांचा (Fossil fuels) वापर थांबवला तरी 2050 पर्यंत ग्लोबल वॉर्मिंग ही धोकादायक पातळी ओलांडेल, असेही हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेल (IPCC) ने म्हटले आहे. (Floods, heat waves and severe droughts; There are danger warnings for the earth)
मनुष्याच्या चुकांमुळेच हा नाश ओढावला आहे.
"आयपीसीसीच्या कार्यसमूह 1 चे सह-अध्यक्ष व्हॅलेरी मैसन-डेलमोटे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनेक दशकांपासून पृथ्वीचे हवामान बदलत आहे आणि हवामानावरील या प्रभावामध्ये मानवांची भूमिका निर्विवाद आहे. उष्णतेची लाट, पाऊस आणि दुष्काळाबाबत नोंदवलेले रेकॉर्ड भयावह आहेत. कारण असे घातक हवामान जगभर पसरण्याचा इशाराच हवामान संस्थेने दिला आहे.
जीवाश्म इंधनासाठी मृत्यूची घडी
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी म्हटले आहे की, हा हवामान अहवाल म्हणजे जीवाश्म इंधनांसाठी मृत्यूची घंटा असालाया हवा आणि त्यांचा वापर त्वरित थांबवावा. समुद्राच्या पातळीत होणारी वाढ आणि पृथ्वीवरील बर्फ वेगाने वितळणे अशा घटना वारंवार घडत आहेत.
1 अब्ज लोक उष्णतेच्या लाटेने जळून खाक होतील
प्राणघातक उष्णतेच्या लाटेत जगभरातील सुमारे 1 अब्ज लोकसंख्या बळी पडू शकते. इतकेच नव्हे तर, दुष्काळामुळे करोडो लोक पाण्यासाठी संघर्ष करतील. जगातील मोठ्या क्षेत्रांना मच्छीमारी करण्यास सक्षम करणारी प्रवाळ मोठ्या प्रमाणावर नष्ट होऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर देश त्यांच्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरले, तर जगाच्या सरासरी तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. हा अहवाल म्हणजे मानवजात भयानक पद्धतीने पृथ्वीचा नाश करत असल्याचा कठोर इशारा असल्याचे यूकेने म्हटले आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.