आसाममध्ये महापूराचा हाहाकार! सहा लाखांपेक्षा जास्त लोकांना फटका, हवामान विभागाने दिला 'हा' इशारा

आसाममध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
Assam flood
Assam floodSaam tv
Published On

आसाम : गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं (Heavy Rainfall) आसाममध्ये महापूर झाला आहे. या महापूराचा फटका २७ जिल्ह्यांना बसला असून जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, ६५२ गावे महापुरामुळं (Assam Flood) प्रभावित झाली असून १६ हजार ६४५ हेक्टर जमीन पुराच्या पाण्याने वाहून गेल्याचं समजते. दरम्यान, आसाममध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

Assam flood
शिवसेनेकडून राज्यसभेसाठी 'या' दोन नावांची चर्चा!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ६ लाखांहून अधिक लोकांना या महापुराचा फटका बसला असून एकाचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तसंच पुरामुळं आसामध्ये सर्वाधिक हानी झाली आहे.पिके आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आसाममध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आसामला या नैसर्गिक संकटापासून दिलासा मिळणं कठीण आहे.

आसामच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील २७ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. तब्बल १४०० हून जास्त गावातील लोक संकटात सापडले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य सुरु केलं आहे. या महापुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल १२५ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com