रश्मी पुराणिक
मुंबई: शिवसेनेकडून (Shivsena) राज्यसभेच्या (Rajyasabha Election) दुसऱ्या जागेसाठी उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्या नावाची चर्चा आहे. उर्मिला मातोंडकर पक्षात आल्यानंतर त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदरांच्या यादीत होते. पण राज्यपालांनी अजूनही सरकारने दिलेली नावं स्वीकारली नाहीत. राज्यसभेवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी एक चांगला चेहरा म्हणून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. या व्यतिरिक्त मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.
राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 तारखेला मतदान होत आहे. यापैकी दोन जागा भाजपला जाणार आहेत तर महाविकास आघाडीतील पक्षांना प्रत्येकी एक जागा जाणार आहे. सहाव्या जागेसाठी राज्यात संघर्ष होणार आहे. शिवसेनेने आपण सहावी जागा लढणार असल्याते जाहीर केले आहे. छत्रपती संभाजीराजेंनी जर शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर त्यांना आम्ही सहावी जागा देऊ असेही शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. भाजपनेही सहावी जागा लढण्याची तयारी दाखवली आहे.
भाजपच्या दोन जागा त्यांच्या आमदारांच्या संख्याबळावर हमखास निवडून येणार आहेत. परंतु आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या जागेसाठीही आमच्याकडे आमदारांचे संख्याबळ असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजेंना पाठिंबा द्यायचा का नाही याबाबत पक्ष निर्णय घेईल असेही फडणवीस म्हणाले आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.