Supreme Court: नवनियुक्त नऊ न्यायामुर्तींनी एकाच वेळी घेतली शपथ

70 वर्षांच्या इतिहासात नऊ न्यायामुर्तींनी एकाच वेळी पदाची शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
Supreme Court: नवनियुक्त नऊ न्यायामुर्तींनी एकाच वेळी घेतली शपथ
Supreme Court: नवनियुक्त नऊ न्यायामुर्तींनी एकाच वेळी घेतली शपथ twittwr/@BarandBench
Published On

Supreme Court

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) आज 9 नवीन न्यायामुर्तींनी (nine judges) पदभार स्वीकारला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N.V. Ramana) यांनी आज सकाळी सर्वांना पदाची शपथ दिली. 70 वर्षांच्या इतिहासात नऊ न्यायाधीश एकाच वेळी पदाची शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ होती. आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनलेल्या 9 न्यायामुर्तींनीपैकी 8 जण मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. तर त्यांच्या व्यतिरिक्त, एक वरिष्ठ वकील देखील थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामुर्तीं म्हणून नियुक्त झाले आहेत.

हे देखील पहा-

पहिल्यांदा शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

सरन्यायाधीशांच्या न्यायालय कक्षात सहसा होणारा हा कार्यक्रम यावेळी वेगळा होता. नवीन न्यायामुर्तींची शपथविधी कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीत बांधलेल्या सभागृहात झाला. या सभागृहात 900 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. यासह, प्रथमच, न्यायाधीशांचा शपथविधी कार्यक्रम दूरदर्शनवर थेट प्रसारित केला गेला.

या न्यायामुर्तींपैकी न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती बी.व्ही.नागरथना आणि पी एस नरसिंह हे भविष्यात भारताचे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात महिला सरन्यायाधीश नव्हत्या. सप्टेंबर 2027 मध्ये भारताला न्यायमूर्ती नागरथनाच्या रूपात पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळू शकतात.

Supreme Court: नवनियुक्त नऊ न्यायामुर्तींनी एकाच वेळी घेतली शपथ
Raj Thackeray : हे बाहेर पडायला घाबरतात, त्यात आमचा काय दोष

सुप्रीम कोर्टात सुमारे दोन वर्षांनंतर नवीन नेमणुका झाल्यानंतर न्यायाधीशांच्या एकूण 34 पैकी 33 पदे या नियुक्त्यांनंतर भरली गेली आहेत. यासह सर्वोच्च न्यायालयातील रिक्त पदे 10 वरून 1 वर आली. सर्वोच्च न्यायालयाची मंजूर संख्या 34 आहे. कॉलेजियमने (Collegium) 17 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाला नऊ न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली होती आणि नंतर 26 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने मान्यता दिली होती.

- या न्यायाधीशांनी घेतली शपथ?

न्यायमूर्ती ए. एस. ओका

न्यायमूर्ती विक्रम नाथ

न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी

न्यायमूर्ती हिमा कोहली

न्यायमूर्ती बी.व्ही.नागरथना

न्यायमूर्ती बेला त्रिवेदी

न्यायमूर्ती सी. टी. रवींद्रकुमार

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश

आणि ज्येष्ठ वकील पी. एस. नरसिंह

न्यायमूर्ती नागरथना 2027 मध्ये पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होऊ शकतात

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com