Raj Thackeray : हे बाहेर पडायला घाबरतात, त्यात आमचा काय दोष

राजकीय मेळावे, यात्रा, सभा या आयोजित करताना कोरोना नियम धाब्यावर बसवले जात नाही का?
Raj Thackeray:  हे बाहेर पडायला घाबरतात, त्यात आमचा काय दोष
Raj Thackeray: हे बाहेर पडायला घाबरतात, त्यात आमचा काय दोषSaam Tv news

गेल्या वर्षी दहीहंडी (Dahihandi) कोरोना (Covid 19) साथीमुळे दहीहंडी साजरी केली नाही, पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. सरकारचं वारंवार दुसरी, तिसरी चौथी लाट सुरु आहे. सर्वत्र गर्दी आहे, सर्व गोष्टी सुरु आहेत, राजकीय दौरे, सभा, मेळावे होत आहेत, काल भास्कर जाधव यांच्या मुलासाठी मंदिर खुले केले मग आम्ही दहीहंडी नाही करायची का, म्हणून मीच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं बिनधास्त दहीहंंडी साजरी करा, बघू जे होईल ते होईल,' असे भुमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडली आहे.

हे देखील पहा-

आज सकाळी मनसैनिकांनी कोरोना निर्बंधांची पायमल्ली करत कल्याण, ठाणेसह काही भागात जोरात दहीहंडी साजरी केली. त्यानंतर राज ठाकरे यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राज ठाकरे यांनी देखील राजकीय मेळावे, यात्रा, सभा या आयोजित करताना कोरोना नियम धाब्यावर बसवले जात नाही का, असा प्रतिप्रश्न केला.

Raj Thackeray:  हे बाहेर पडायला घाबरतात, त्यात आमचा काय दोष
संगणकासह, महागड्या सायकल चाेरणारे एलसीबीच्या जाळ्यात

जनआशिर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरासमोर हाणामारी झाली. राज्यभरात राजकीय मेळावे सुरू, सभा सुरु. भास्कर जाधवांच्या मुलांसाठी मंदिर उघडले, क्रिकेट, फुटबॉलची मैदानं सुरू, जुन्या महापौर बंगल्यावर बिल्डरांबच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाही, मग हिंदू सणांवरच बंदी का, मंदिरे उघडली पाहिजे. सगळे सण साजरे झाले पाहिजेत, नाहीतर सर्वांना एकच नियम लावा, यांची बाहेर यायला फाटते त्यात आमचा काय दोष, असे म्हणत त्यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com