आंध्र प्रदेशच्या एलुरू येथे फटाक्याचा स्फोट झाल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर ६ जण जखमी झालेत. स्कुटीवर फटाके घेऊन जातांना फटाक्यांचा स्फोट झाला. ही घटना दिवाळीच्या दिवशी झाल्याने परिसरात शोककळा पसरलीय. ही घटना एलुरू शहरातील रहिवाशी भागात घडली असून या दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर शहारे येतात.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काही तरुण स्कुटीवरून पिशवीतून फटाके घेऊन जात होते. गल्लीतून जातांना एका चौकात काही तरुण उभे होते, त्याचवेळी स्कुटीचं संतुलन बिघडलं आणि स्कुटी खड्ड्यात पडली. तेव्हा फटाक्यांची पिशवी खाली पडली त्यानंतर स्पार्क होऊन ते फटाक्यांचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात स्कुटीवरील तीन तरुण आणि चौकात उभे असलेले लोक होरपळलेत.
यात एकाचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झालेत. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरड सुरू झाला. यावेळी उपस्थित स्थानिक नागरिक जखमींच्या मदतीसाठी धावले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय. तर जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. क्षणार्धात आनंदात विरजण पडलं आणि सर्व परिसरात शोककळा पसरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.