BS Yediyurappa News : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांवर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई

Karnataka News : येडियुरप्पा यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
BS Yediyurappa News
BS Yediyurappa NewsSaam TV
Published On

BS Yediyurappa News :

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्रीआणि भाजपचे वरिष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येडियुरप्पा यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी कलमांर्तग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest marathi News)

BS Yediyurappa News
Mamata banerjee injured : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत, कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु

एफआयआरमधील माहितीनुसार, एका १७ वर्षीय मुलीच्या आईने 2 फेब्रुवारी याबाबत तक्रार दाखला केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी येडियुरप्पा यांनी अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीडित मुलगी आणि तिची आई एका फसवणूक प्रकरणात येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती एफआयआरमध्ये आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आलं आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने जवळपास ५३ प्रकणांची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये संबंधित महिलेने वेगवेगळ्या प्रकरणात अशाच प्रकारे तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.

BS Yediyurappa News
Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं; राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली MSPकायद्यासह ५ गॅरंटी

कोण आहेत बीएस येडियुरप्पा?

बीएस येडियुरप्पा २००८ आणि २०११ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यानंतर मे २०१८ मध्ये आणि पुन्हा जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २०२१ त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाची आपला निर्णय जाहीर करताना येडियुरप्पा मंचावर रडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com