Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. काही लोकांना असं वाटतंय की त्यांना देवापेक्षा जास्त कळतं. लोकांना वाटते की पंतप्रधान मोदींना सर्व काही माहित आहे.
त्यांना वाटते की ते इतिहासकारांना इतिहास, शास्त्रज्ञांना विज्ञान आणि सैन्याला युद्धशास्त्र समजावून सांगू शकतात. जर मोदींनी देवाजवळ बसवलं तर ते देवालाही समजावू शकतील, असा मिश्कील टोला राहुल गांधी यांनी लगावला. राहुल गांधी सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील तीन शहरांना ते भेट देणार आहेत.
भारतात राजकारण करणे कठीण बनलं
देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. सरकारवर आरोप करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. विरोधकांना गप्प करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. यामुळे भारतात राजकारण करणे कठीण बनलं आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. (Political News)
सरकारच्या द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही भारत जोडो यात्रा काढली. आमची भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं. द्वेषाच्या राजकारणात आम्ही प्रेमाचे दुकान उघडले आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
भारत जोडो यात्रेचा अनुभव
राहुल गांधींनी यावळे आपला भारत जोडो यात्रेतील अनुभवही शेअर केला. मी भारत जोडो यात्रा सुरु केला तेव्हा 5-6 दिवसांनी मला जाणवलं की हे फार सोपं नसणार. हजारो किमी पायी चालणे कठीण आहे. मात्र माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. मी आणि काँग्रेस माझ्यासोबत कार्यकर्तें रोज 25 किमी अंतर कापत होतो.
तीन आठवड्यांनंतर मला जाणवलं की मी थकत आहे. मी माझ्या सोबतच्या लोकांना ते थकत आहेत का अशी विचारणा केली. त्यावेळी कुणीही हो उत्तर दिलं आहे. सर्वांचं म्हणणं होतं की भारत जोडो यात्रेत केवळ काँग्रेस नाही तर संपूर्ण देश चालत आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.