Santosh Bangar : लग्नाला आलेल्या संतोष बांगरांसमोर '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Santosh Bangar Viral Video: ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि संतोष बांगर समोरसमोर आले.
santosh bangar
santosh bangar saam tv
Published On

Parbhani News: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे गटातील नेत्यांना जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचा होत असेलल्या विरोधामुळे अनेकदा नेत्यांची अनेकदा दमछाक होते. शिंदे गटाच्या नेत्यांना 50 खोके घेत बंडखोरी केल्याचा आरोप सातत्याने ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे.

याच मुद्द्यावर शिंदे गटाचे नेते दिसले की 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली जाते. असाच एक प्रसंग शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासोबत घडला आहे. (Latest News)

santosh bangar
Saamana Editorial on 9 Years Of Modi : मोदींची 9 वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड, 'सामना'तून सडकून टीका

आमदार संतोष बांगर काल रात्री परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे एका लग्न समारंभाला आले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि संतोष बांगर समोरसमोर आले. संजय जाधव यांना पाहताच संतोष बांगर यांनी त्यांचे चरणस्पर्श केले.

santosh bangar
Pune Crime News: नातीसमोरच सासऱ्याने सुनेला क्रूरपणे संपवलं; अनैतिक संबंधांना विरोध केल्याने हत्या

त्यानंतर संतोष बांगर पुढे निघून गेले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके, अशी घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com