Shocking News : हॉस्पिटलमध्ये नर्सचा प्रताप, ७ वर्षीय मुलाच्या जखमेवर टाक्यांऐवजी चोळलं फेविक्वीक

Hospital News : मुलाच्या गालावर जखम झाल्याने त्याचे पालक एका शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. तेथील नर्सने मुलाच्या जखमांवर टाके मारण्याऐवजी त्यावर फेविक्वीक लावले. तसेच मी अनेक वर्षांपासून असं करते असेही नर्स म्हणाली.
female nurse apply fevikwik on patients cheek's wound
female nurse apply fevikwik on patients cheek's woundMeta Ai
Published On

Shocking News : सरकारी रुग्णालयात एका नर्सने उपचारादरम्यान फेविक्वीकचा वापर केल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमेवर टाके लावल्याने जखमेची खूण तशीच राहील त्यापेक्षा फेविक्वीक चांगलं आहे असंही त्या नर्सने रुग्णाच्या कुटुंबीयांना सांगितले. हा प्रकार रुग्णांच्या कुटुंबीयांना रेकॉर्ड केला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या हनागल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका सात वर्षाच्या मुलगा आणि त्याचे पालक पोहोचले. लहान मुलाच्या गालाला दुखापत झाली होती. रक्तस्त्राव सुरु असल्याने आरोग्य केंद्रातील नर्सने उपचार करायला सुरुवात केली. जखम मोठी असल्याने त्यावर टाके लावण्याची गरज होती. पण नर्सने त्या मुलावर टाके लावण्याऐवजी चक्क फेविक्वीक लावले.

जखमेवर फेविक्वीक लावल्यावर लहान मुलाच्या कुटुंबीयांनी नर्सला जाब विचारला. त्यावर नर्स म्हणाली, 'जखमेवर टाके लावल्याने गालावर खूण तशीच राहील. त्यापेक्षा फेविक्वीक लावणं चांगले आहे. फेविक्वीकमुळे कोणत्याही खुणा दिसणार नाही. मी कित्येक वर्षांपासून हेच करत आले आहे.' तेव्हा मुलाच्या पालकांनी नर्सचा व्हिडीओ बनवून तिच्या वरिष्ठांना दाखवला.

female nurse apply fevikwik on patients cheek's wound
Crime : शिक्षकच भक्षक ठरले! ३ जणांनी शाळकरी मुलीवर केला सामूहिक बलात्कार

व्हिडीओ पाहून नर्सवर तक्काळ कारवाई करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्त कार्यालयाने निवदेनही जारी केले. 'फेविक्वीक हा चिकट पदार्थ आहे. त्याचा वापर वैद्यकीय उपचारांदरम्यान करण्यास परवानगी नाही. या प्रकरणात बेजबाबदार नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुढील चौकशी करण्यात आली आहे', असे निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.

female nurse apply fevikwik on patients cheek's wound
Bangladesh Clashes: भाषण सुरू होण्याआधी बांगलादेशात वडिलांचं स्मारक जाळलं; संतापलेल्या शेख हसीना यांनी भारतातून दिला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com