केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक; कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक; कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक; कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी Saam Tv

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी कृषी कायदे मागे farm laws घेण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता हे विधेयक संसदेमध्ये मांडले जाणार आहे. त्याअगोदर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

मागील वर्षी तयार करण्यात आलेले ३ कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेती कायदे रद्द विधेयक २०२१ असे एकच विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाशी सल्लामसलत केल्यावर या विधेयकाला अंतिम रुप आल्याचे सांगितले जात आहे. तसेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर Union Agriculture Minister Narendra Singh Tomar या अगोदर लोकसभेत कायदे रद्द करणारे विधेयक मांडू शकतात, अशी माहिती मिळाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक; कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी
भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याच्या धमक्या; सुरक्षेची मागणी

मागील वर्षी संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकारने Central Government शेतकऱ्यांसाठी farmers ३ कृषी कायदे आणले होते. मात्र, शेतकऱ्यांना हे कायदे मंजूर नव्हते. यामुळे जवळपास एक वर्षापासून राजधानीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते. शेतकऱ्यांचे आंदोलन इतके व्यापक होते की, त्याची विदेशामधून देखील दखल घेण्यात आली होती. या आंदोलनामध्ये आतापर्यंत ६०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील सरकार त्यांच्या कायद्यावर ठाम होते.

मात्र, शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी अचानक कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे. संसदेत कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आता कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला आज मंजुरी मिळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com