Fact Check: मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांना फुकट लॅपटॉप? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Viral Message Fact Check: आता विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना केंद्राकडून मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे. सोशल मीडियात याबाबतचा एक मेसेज व्हायरल होतोय. साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया.
Viral Message Fact Check:
IS MODI GOVERNMENT GIVING FREE LAPTOPS TO STUDENTS? KNOW THE TRUTHsaam Tv
Published On

विद्यार्थ्यांना आता सरकार लॅपटॉप देणार आहे. तेही मोफत. असा मेसेज व्हायरल होतोय. कारण, आता कॉलेज सुरू झालीयत. त्यामुळे खरंच आता विद्यार्थ्यांना सरकार मोफत लॅपटॉप देणार आहे का? कारण, सध्याचे युग हे इंटरनेटचं युग आहे. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप या आता गरजेच्या वस्तू बनल्या आहेत. विद्यार्थ्यांना हे मोफत लॅपटॉप कसे दिले जाणार आहेत? सरकारची अशी कोणती योजना आहे? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत. डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राकडून ही योजना आणण्यात आली आहे. मोफत लॅपटॉपसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. हा मेसेज व्हायरल होत असून त्यासोबत लिंकही देण्यात आलीय. या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणार असेल तर तो कसा मिळणार? त्यासाठी अर्ज कुठे करायचा? हे सांगणं गरजेचं आहे. आमच्या टीमने सरकारकडून माहिती मिळवली. तसंच पीआयबी सर्चही केला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Viral Message Fact Check:
Modi Government Decision: केंद्र सरकाराचा मोठा निर्णय! ELI योजनेला मंजुरी, नोकरीच्या विश्वात पहिल्यांदाच येणाऱ्यांना मिळणार मोठी भेट

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

विद्यार्थ्यांसाठी केंद्राची लॅपटॉप वाटपाची कोणतीही योजना नाही

सरकार विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणार हा दावा खोटा

मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका

योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

Viral Message Fact Check:
PM Kaushal Vikas Yojana Registration: आर्थिक मदत आणि स्वरोजगाराची संधी देणारी योजना; कशी कराल नावाची नोंदणी, जाणून घ्या अटी आणि पात्रता

हा मेसेज विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जातात. त्यामुळे लिंकवरही क्लिक करू नका, फसवणूक करणारे असे मेसेज व्हायरल करत असतात.आमच्या पडताळणीत विद्यार्थ्यांना सरकार मोफत लॅपटॉप देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com