Yogi Adityanath: योगी सरकारचा पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

काल मंत्री मंडळाने शपथ घेतली. आज कॅबिनेट बैठक झाली, या बैठकीत 3 महिन्यांनी फ्री रेशनिंग योदजना वाढवली आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) काल योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज लगेच त्यांनी कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत कॅबिनेटच्या मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना (Corona) काळात सुरु केलेली मुक्त रेशन योजना तीन महिन्यांनी वाढवली आहे.

आम्ही पुढील 3 महिन्यांसाठी मोफत रेशन योजना पुन्हा राबवत आहे. याचा फायदा राज्यातील 15 कोटी लोकांना होणार आहे. ही योजना कोरोना (Corona) महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Yogi Adityanath
Yogi Adityanath | उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा 'योगीराज' !;पाहा व्हिडीओ

या बैठकीवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत बाहेर पडले. या निर्णयामुळे थेट 15 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे असे उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले. यावेळी ब्रिजेश पाठक म्हणाले की, सरकार सातत्याने गरिबांची काळजी घेत असून त्याचा थेट लाभ करोडो कुटुंबांना मिळणार आहे.

आज योगी 2.0 ची पहिली कॅबिनेट बैठक आहे आणि आजच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे आणि विभागांच्या वितरणावरही चर्चा होऊ शकते, असे कॅबिनेट बैठकीपूर्वी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री संदीप सिंह म्हणाले होते.

योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजप (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीनंतर 52 मंत्र्यांनीही शपथ घेत आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com