Sam Pitroda: सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने पेटला वाद, ‘वारसा कर'वरून भाजपने केलं काँग्रेसला टार्गेट

Inheritance Tax: काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी कराच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. सॅम यांनी 'वारसा कर' याबद्दल वक्तव्य केलं आहे. यातच वारसा कर म्हणजे काय, हे आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
Sam Pitroda
Sam PitrodaSaam Tv

What is inheritance tax:

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी कराच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. सॅम यांनी 'वारसा कर' याबद्दल वक्तव्य केलं आहे. यातच वारसा कर म्हणजे काय, हा कर कुठे लावला जातो आणि कसा लावला जातो, हे आपण या बातमीतून सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यातच सॅम पित्रोदा यांनी वारसा कराबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर गदारोळ सुरू झाला आहे. याच मुद्द्यावरून भाजपने सॅम यांच्यावर हल्लाबोल सुरू केला असतानाच काँग्रेसही त्यांच्या वक्तव्यापासून अनंतर पाळत असल्याचं दिसत आहे.

Sam Pitroda
Personal Loanघेताना चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान

कशी झाली वादाची सुरुवात?

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एका सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, निवडणुकीनंतर आपले सरकार सत्तेवर आल्यास सर्वेक्षण केले जाईल आणि कोणाकडे किती मालमत्ता आहे, याची माहिती घेतली जाईल. राहुल गांधींच्या या वक्तव्यबात सॅम पित्रोदा यांना विचारले असता त्यांनी अमेरिकेत लागू करण्यात आलेल्या वारसा कराचा उल्लेख केला.

सॅम पित्रोदा म्हणाले की, अमेरिकेत वारसाला सोडलेल्या मालमत्तेवर कर आकाराला जातो. अमेरिकेत जर एखाद्याची 10 कोटी डॉलर्सची संपत्ती असेल आणि तो मरण पावला, तर त्याच्या मुलांना फक्त 45 टक्के संपत्ती मिळते. उर्वरित 55 टक्के मालमत्ता सरकारकडे जाते.

या कायद्याची माहिती देताना सॅम पित्रोदा म्हणाले की, हा कायदा सांगतो की, तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही संपत्ती कामवाली आहे, त्यातली अर्धी मालमत्ता तुम्ही जग सोडून जाताना जनतेसाठी सोडली पाहिजे. ते म्हणाला की, हा चांगला कायदा आहे आणि मला तो आवडतो. भारतात असे नाही. भारतात कुणाची 10 अब्ज रुपयांची संपत्ती असेल आणि तो मेला तर त्याच्या मुलांना संपूर्ण मालमत्ता मिळते, त्यातून जनतेला काहीच मिळत नाही.

वारसा कर काय आहे?

अमेरिकेत वडिलोपार्जित मिळणाऱ्या मालमत्तेवर कर लावला जातो. याला इनहेरिटन्स टॅक्स म्हणतात. हा कर मालमत्ता मिळणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीने भरावा लागतो. असं असलं तरी अमेरिकेत वारसा कर हा फक्त सहा राज्यांमध्ये आकारला जातो. मरण पावलेली व्यक्ती कोणत्या राज्यात राहत होती किंवा त्याची मालमत्ता कोणत्या राज्यात होती यावर हा कर अवलंबून असतो. तसेच वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचे मूल्य काय आहे आणि मृत व्यक्तीशी त्याचा काय संबंध आहे, हेही यात महत्त्वाचं आहे.

Sam Pitroda
AC Tips: या तापमानावर चालवा 'एसी', वीजेचे बिल येणार कमी

कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो वारसा कर?

वारसा कर आकारला जाईल की, नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. मर्यादेपेक्षा जास्त रकमेवरच वारसा कर आकारला जातो. जर वारसा हक्काची रक्कम विहित मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यावर हा कर लावला जात नाही. साधारणपणे सुरुवातीला 10 टक्क्यांपेक्षा कमी कर लावला जातो आणि नंतर तो 15 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढतो. एखाद्याला मिळणारी सूट आणि आकारला जाणारा कर दर देखील मृत व्यक्तीशी असलेल्या व्यक्तीच्या संबंधांवर अवलंबून असतो.

या देशांमध्येही आकाराला जातो वारसा कर

अमेरिकेशिवाय जगात असे अनेक देश आहेत जिथे वारसा कर लावला जातो. यामध्ये जपानमध्ये 55 टक्के वारसा कर लागू आहे. दक्षिण कोरियामध्ये 55 टक्के वारसा कर लागू आहे. फ्रान्समध्ये 45 टक्के वारसा कर लागू आहे. ब्रिटनमध्ये 40 टक्के वारसा कर लागू आहे. अमेरिकेत 40 टक्के वारसा कर लागू आहे. स्पेनमध्ये 34 टक्के वारसा कर लागू आहे. आयर्लंड 33 टक्के वारसा कर लावतो. बेल्जियममध्ये 30 टक्के वारसा कर लागू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com