Explainer : मुख्यमंत्रिपदाचे ७ नेते दावेदार, तरीही आतिशी यांचीच निवड का? वाचा सविस्तर

Atishi Marlena/Delhi New CM : अरविंदे केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर ७ नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. तरीही आतिशी यांची निवड करण्यात आली आहे.
Explainer
ExplainerSaam Digital
Published On

मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर लगेचचं केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा करत संपूर्ण देशाला धक्का दिला. त्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू असताना दिल्ली सरकारमधील महिला मंत्री आतिशी मार्लेना सिंह यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आता त्या मुख्यमंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारतील. ११ वर्षांनंतर दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे. तरीही मुख्यमंत्रिपदाचे ७ नेते दावेदार असताना आतिशी यांचीच निवड का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोण कोण होते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एकूण ७ नावं समोर आली होती. यामध्ये पहिलं नाव त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचं होतं. मात्र, आमदार नसल्यामुळे त्यांच्या दावेदारीची शक्यता सुरुवातीपासूनच कमी होती. याशिवाय मंत्री गोपाल राय, कैलाश गहलोत, आतिशी, सौरभ भारद्वाज, राखी बिडलान आणि कुलदीप कुमार हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. सौरभ भारद्वाज यांनी तर आपल्या दावेदारीबाबत मीडियाशी उघडपणे बोलले होते.

पडत्या काळात पक्षासाठी महत्त्वाची भूमिका

मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना मद्य घोटाळा प्रकरणात अटक झाली होती. पक्षात आणि सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कोणताही नेता शिल्लक नव्हता. या कठीण काळात आतिशी यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाय सौरभ भारद्वाज यांच्यासह लोकसभा निवडणुकीवेळी सरकारच्या बाजूने प्रचार केला. हरियाणा सरकारने जून महिन्यात १०० दशलक्ष गॅलन प्रतिदिन पाणी न सोडल्यामुळे राजधानीत निर्माण झालेल्या पाणी संकटाविरोधात त्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलं होतं. यावेळी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात देखील दाखलं करावं लागलं होतं.

Explainer
Atishi Marlena : 'आज दु:खच जास्त, कोणीही शुभेच्छा द्यायची नाही, हार घालायचा नाही'; दिल्लीच्या नव्या CM आतिशी असं का म्हणाल्या?

महत्त्वाच्या शिक्षण खात्याची जबाबदाही

महत्त्वाच्या शिक्षण खात्यासह तब्बत १४ खात्यांची जबाबदारी आतिशी यांच्याकडे होती. गेल्या वर्षी ९ मार्च रोजी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. केजरीवाल सरकारने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची यूनेस्कोनेही दखल घेतली होती. याच खात्याची जबाबदारी आतिशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांची आम आदमी पक्षातील प्रतिष्ठाही वाढली आहे.

मनीष सिसोदिया यांच्या निकडवर्तीय

आतिश मनीष सिसोदिया निकटवर्तीय राहिल्या आहेत. यांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांचं भावनिक स्वास्थ आणि कौशल्य विकास व्हावा यासाठी ‘हॅपिनेस करिक्युलम’ आणि ‘आंत्रप्रेन्योरशिप माइंडसेट करिक्युलम’ हे अभ्यासक्रम सरकारी शाळांमध्ये सुरू करण्यात आले. २०११ भ्रष्टाचार विरोधी आंदोनादरम्यान आतिशी यांचा आपच्या AAP च्या सदस्यांशी पहिल्यांदा भेट झाली. तिथून पुढे त्या आंदोलनात सहभागी झाल्या आणि पुढे पक्षाचं कामही करू लागल्या. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. पक्षात त्यांच्या इतका उच्च शिक्षित नेता नाही. त्यामुळे पडत्या काळात आतिशी यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान आणि त्यांचा अनुभव, सामाजिक कार्यामुळे त्यांना संधी देण्यात आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Explainer
Explainer : भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, सत्ता अन् तुरुंगवास, कसा आहे आपचा १२ वर्षांचा प्रवास? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com