Atishi Marlena : 'आज दु:खच जास्त, कोणीही शुभेच्छा द्यायची नाही, हार घालायचा नाही'; दिल्लीच्या नव्या CM आतिशी असं का म्हणाल्या?

Delhi New CM : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिली प्रतिक्रीया दिली आहे. आपल्याला कोणीही शुभेच्छा द्यायच्या नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.
Atishi Marlena : 'आज दु:खच जास्त, कोणीही शुभेच्छा द्यायची नाही, हार घालायचा नाही'; दिल्लीच्या नव्या CM आतिशी असं का म्हणाल्या?
Published On

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिली प्रतिक्रीया दिली आहे. आज मला जितका आनंद आहे तितकच दुःखही आहे. मी मुख्यमंत्री झाल्याबद्दल कोणीही शुभेच्छा देऊ नये आणि हारही घालू नये. केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे दिल्लीच्या जनतेला खूप दुःख झाले आहे आणि भाजपच्य कटकारस्थानांमुळे जनतेत संतापाचा लाट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"मी सर्वप्रथम अरविंद केजरीवाल यांचे आभार मानते की त्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली. केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझे नेते आणि गुरु केजरीवाल यांचे याबद्दल आभार.", अशा भावना आतिशी यांनी व्यक्त केल्या आहेत.
आतिशी, मुख्यमंत्री, दिल्ली

प्रामाणिक मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप

हे फक्त आम आदमी पार्टीमध्येच होऊ शकते, जिथे पहिल्यांदा आमदार झालेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलं जातं. मला खूप आनंद आहे की अरविंद केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, परंतु त्याचवेळी दुःखही आहे की आज अरविंद केजरीवाल राजीनामा देत आहेत. मात्र दिल्लीचे एकच मुख्यमंत्री आहेत आणि ते म्हणजे अरविंद केजरीवाल. भारतीय जनता पक्षाने एका प्रामाणिक माणसावर खोटे आरोप लावले, खोट्या खटल्यात 6 महिने तुरुंगात ठेवले. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना केवळ जामीन दिला नाही तर त्यांच्या विरोधकांना चपराकही लगावली आहे. सरकारी तपास यंत्रणा पोपट असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

कटकारस्थानांमुळे भाजपाविरोधात संतापाची लाट

कोणी दुसरा नेता असता तर त्याने पद सोडलं नसतं, परंतु इतिहासात पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांने राजीनामा देत जनतेच्या न्यायालयात जाईन आणि जेव्हा जनता म्हणेल की मी प्रामाणिक आहे, तेव्हाच पुन्हा पदावर येईन, असं म्हणत पदाचा त्याग केला आहे. आज दिल्लीकरामध्ये भाजपने रचलेल्या या कटकारस्थानामुळे संतापाची लाट आहे.

Atishi Marlena : 'आज दु:खच जास्त, कोणीही शुभेच्छा द्यायची नाही, हार घालायचा नाही'; दिल्लीच्या नव्या CM आतिशी असं का म्हणाल्या?
Explainer : मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचीच निवड का?, अरविंद केजरीवाल यांचा काय आहे मास्टर प्लान? वाचा सविस्तर

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले नाहीत तर, चांगलं शिक्षण, मोफत वीज, मोफत आरोग्य सुविधा, मोफत प्रवास मिळणार नाही, हे दिल्लीच्या जनतेला चांगलं माहिती आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत एकच काम करणार आहे. ते म्हणजे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणे. भाजप आणि उपराज्यपाल ज्या योजनांना बंद करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना सुरू ठेवणार आहे आणि दिल्लीच्या जनतेचं रक्षणही करणार आहे.

मी मुख्यमंत्री झाल्याबद्दल लोकांनी शुभेच्छा देऊ नयेत, असे आवाहन करत आतिशी पुढे म्हणाल्या, "तुम्ही मला शुभेच्छा देऊ नका. फुलांची माळ घालू नका कारण आज अरविंद केजरीवाल राजीनामा देत आहेत. आज खूप दुःखाचा क्षण आहे. मी फक्त निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्री राहणार आहे. केजरीवाल यांनी त्यागाचा नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे पुन्हा केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे."

Atishi Marlena : 'आज दु:खच जास्त, कोणीही शुभेच्छा द्यायची नाही, हार घालायचा नाही'; दिल्लीच्या नव्या CM आतिशी असं का म्हणाल्या?
Explainer : भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, सत्ता अन् तुरुंगवास, कसा आहे आपचा १२ वर्षांचा प्रवास? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com