RSS Chief Mohan Bhagwat: देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती 'हिंदू'; RSS प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य

40 हजार वर्षे जुन्या 'अखंड भारत'चा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा DNA सारखाच आहे.
mohan Bhagwat
mohan Bhagwat saam tv
Published On

RSS Chief Mohan Bhagwat: देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती 'हिंदू' आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए समान असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं. मंगळवारी छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असं वक्तव्य केलं आह.

कोणीही धार्मिक विधी करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही. भारतात विविधतेत एकता आहे. भारताची प्राचीन वैशिष्ट्य आहेत. संपूर्ण जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना आहे जी सर्वांना सोबत घेण्यावर विश्वास ठेवते. (Latest marathi News)

mohan Bhagwat
Beed News : लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर चार वर्ष अत्याचार; बीडमधील धक्कादायक घटना

भागवत पुढे म्हणाले की, मी ठामपणे सांगत आलो आहे की भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. जे लोक भारताला आपली मातृभूमी मानतात. विविधता असूनही एकतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेवून एकत्र राहू इच्छितात ते हिंदू आहेत. धर्म, संस्कृती, भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा विचारसरणी काहीही असो, सर्व हिंदूच आहेत, या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.

mohan Bhagwat
होय मी बदला घेतला, बेईमानीला जागा दाखवलीच पाहिजे; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

40 हजार वर्षे जुन्या 'अखंड भारत'चा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा DNA सारखाच आहे. आपल्या पूर्वजांनी शिकवलंय की प्रत्येकाने स्वतःच्या श्रद्धेवर आणि उपासनेच्या पद्धतीला धरुन रहावे. तसेच इतरांच्या श्रद्धा आणि उपासनेची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करू नये, असं मोहन भागवत यांनी म्हटलं.

देशात पूर्वीच्या तुलनेत आता स्वयंसेवकांची संख्या वाढली आहे. देशभरात झपाट्याने वाढणारी ही संघटना अतिशय अनोखी आहे. संघाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण संघाची तुलना कोणाशीही करू शकत नाही. जर आपल्याला संघाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला त्यात सामील व्हावे लागेल, असंही भागवत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com