Russia-Ukraine War: रशिया- युक्रेन युद्धात युरोपीय देशांची एन्ट्री; युद्ध आणखी भडकणार?

Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धात आता युरोपीयन देशांनी उडी घेतलीय. मात्र युरोपीयन देश रशियाविरोधात का उभे राहिलेत? युरोपीयन देशानी कोणती रणनिती आखलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Russia-Ukraine War
European nations announce war strategy with Ukraine to counter Russia’s military aggression.saam tv
Published On
Summary
  • रशिया-युक्रेन युद्धात युरोपीय देश उतरले आहेत.

  • युरोपने युक्रेनच्या ड्रोन शक्तीचा वापर करण्याची रणनिती आखली आहे.

  • ट्रम्प युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत पण यश मिळालेलं नाही.

  • युरोपच्या हस्तक्षेपामुळे रशियाविरोधातील लढाई तीव्र होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र अमेरिकेच्या अटीशर्ती युरोप आणि युक्रेन या दोन्ही देशांना मान्य नाहीत. त्यामुळेच युरोपने रशियाविरोधात युद्धाची तयारी सुरु केलीय. युरोपीय देश युक्रेनच्या ड्रोन शक्तीचा फायदा घेऊन रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. युरोपची नेमकी रणनिती काय आहे? पाहूयात.

काय आहे युरोपची रणनिती

युरोप युद्धाविरामाआधी युक्रेनमध्ये सैन्य तैनात करणार

रशियावर युद्धविराम करण्यासाठी दबाब टाकण्याचा प्रयत्न

युक्रेनमध्ये 40 लाख ड्रोन बनवण्याचा युरोपचा प्लॅन

ड्रोन उत्पादन दुप्पट करून रशियाविरोधात आक्रमक पवित्रा

युरोपीय देश युक्रेनमध्ये 100 पेक्षा अधिक ड्रोन प्लॅट उभारणार

युक्रेनी ड्रोन हल्ल्यानं रशियाचा पराभव करण्याची तयारी

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

ट्म्प वारंवार रशियाबद्दल मवाळ भूमिका घेऊन युक्रेनला झुकण्यास भाग पाडत आहेत. युद्धविरामासाठी युक्रेनचा वापर करण्याचा डाव ट्रम्प यांनी आखलाय, त्याचवेळी युरोपनं युक्रेनबरोबर ड्रोन डिल करून शेजारील देशांनी नवी रणनिती आखलीय. यात लिथुआनिया, रोमानिया, कॅनडा, युक्रेन यांचा समावेश असणार आहे.

Russia-Ukraine War
Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

रशियानं युक्रेनला युद्धात पराभूत केलं तर नाटोमधील इतर युरोपीयन देशांना धोका आहे. तसचं रशियाचा आक्रमकपणा थांबवण्यासाठी युरोपीय देश युक्रेनच्या माध्यमातून रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र युक्रेनचं ड्रोन सामर्थ्य वाढल्यास नव्यानं युद्धाला सुरुवात होईल, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com