Pilots Fall Asleep : वाहतूक क्षेत्रातील प्रवास करण्याचं सर्वात वेगवान वाहन म्हणजे विमान. कुठेही जलद गतीने पोहचायचं असेल तर अनेकजण विमानाचा (Flight) प्रवास करतात. जिथे ट्रेन आणि बसला पोहचण्यासाठी 10 ते 12 तास लागतात तिथे विमान तुम्हाला फक्त तासाभरात सोडू शकतं. मात्र, अनेकदा विमानांचे अपघात (Accident) झाले. त्यामुळे आजही अनेकजण विमानात बसायला घाबरतात. अशातच सोमवारी एका विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकणारी घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, सुदानच्या खार्तुम येथून एक विमान इथिओपियाची राजधानी अदीस अबाबासाठी निघालं होतं. आपला प्रवास सुखकर होईल या आशेने प्रवासी आनंदात होते. विमानाने उड्डाण भरली. सर्व प्रवासी निश्चिंत होते. अशातच विमान ३७ हजार फुटावर असताना दोन्ही पायलटला गाढ झोप लागली. विमान जाणाऱ्या इथोपियन कंपनीच्या विमानाच्या पायलट्सना गाढ झोप लागली.
दोन्ही पायलट इतके गाढ झोपी गेले की, त्यांना कुठलंही भान राहिलं नाही. अशात हे विमान अदीस अबाबा विमानतळावर उतरू शकलं नाही. इतकंच काय तर विमानाचं लँडिंग जवळ आलं असतानाही त्यांनी विमानाचा वेग कमी केला नाही. दुसरीकडे लॅंडिंगची वेळ होऊनही विमान खाली का आलं नाही? असा प्रश्न वाहतूक नियंत्रण कक्षाला पडला. त्यांनी दोन्ही पायलट्सना अनेकदा संपर्क केला, मॅसेजही केले. तरी त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
सुदैवाने या काळात विमान ऑटो पायलट मोडवर असल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. दरम्यान, आकाशात उंचीवर असलेल्या आकाशात असलेल्या विमानानं विमानतळाची धावपट्टी ओलांडताच ऑटो पायलट डिस्कनेक्ट झाला. त्यामुळे पायलट्सच्या केबिनमध्ये असलेला अलार्म वाजू लागला. त्या आवाजानं पायलट्सना जाग आली आणि त्यांनी विमान लँड केलं.
हा सर्व प्रकार प्रवाशांचा लक्षात आला पण त्यावेळी विमानाचं लॅंडिग यशस्वीरित्या झालं होतं. या सर्व प्रकारानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. विशेष बाब म्हणजे लॅंडिग करण्यासाठी सुद्धा या विमानाला साधारण: २५ मिनिटं लागली. या वेळेत विमान आकाशात घिरट्या घालत होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.