डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टिनवर बलात्काराचा आरोप, गोळी लागून महिलेचा मृत्यू

Epstein Files Spark Controversy: अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जेफ्री एप्स्टिन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीत काही गंभीर आरोप समोर आले आहेत. कागदपत्रांमधल्या दाव्यांनुसार काही वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता.
Former US President Donald Trump pictured during a public event amid renewed controversy following the release of Epstein case documents.
Former US President Donald Trump pictured during a public event amid renewed controversy following the release of Epstein case documents.Saam Tv
Published On

बहुचर्चित एप्स्टिन फाईलनं जगभरात खळबळ माजवलीय. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित आरोपांची कागदपत्र समोर आल्यानं अमेरिकेचं राजकारण ढवळून निघालय. मंगळवारी सार्वजनिक करण्यात आलेल्या या एप्स्टिन फाईलमधील कागदपत्रांनुसार एका महिलेनं ट्रम्प यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर गोळी लागून या महिलेचा मृत्यू जाला. मात्र न्याय विभागानं ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी हे असत्य आणि सनसनाटी पसरवण्यासाठी केलेले आरोप असल्याचं सांगितलंय.

ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप

2020च्या निवडणकीपूर्वी ट्रम्प यांच्यावरील आरोपांची फाईल एफबीआयकडे पाठवण्यात आली होती. त्यात एका कथित पीडित महिलेनं ट्रम्प आणि एप्स्टिन यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचा दावा होता. मात्र त्याला कोणताही विश्वसनीय आधार नव्हता असं न्याय विभागानं स्पष्ट केलंय. या प्रकरणात एका लिमोजीन ड्रायव्हरची साक्ष देखील होती. अमेरिकेच्या न्याय विभागाने या फाईल्समध्ये कुठंही डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणात संशयित मानले गेल्याचा पुरावा आढळून आलेला नाही. मात्र एप्स्टिन आणि ट्रम्प 2000च्या दशकात सामाजिक कामांच्या निमित्तांन संपर्कात होते असही सांगण्यात येतंय.

सध्या एप्स्टिन फाईल्सने जगभरात धुमाकूळ घातलाय. या फाईल्समधून जगभरातील दिग्गज नेत्यांचे एप्स्टिनसोबतचे फोटो आणि इतर गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र अमेरिकेन न्यायविभागाने ट्रम्प यांच्यावरील बलात्काराचा आरोप फेटाळून लावलाय. केवळ प्रसिद्धीसाठी कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय हे आरोप केले जात असल्याचं न्याय विभागाने म्हंटलंय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना क्लिन चिट मिळालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com