EPFO: घरात लग्नकार्य आहे? मग PF खात्यातून काढू शकता इतके पैसे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PF Withdrawal: घरात लग्नकार्य आहे? मग PF खात्यातून काढू शकता इतके पैसे
EPFO Update
EPFO UpdateSAAM TV
Published On

EPF Advance: भविष्य निर्वाह निधी (PF) हे नोकरदार लोकांसाठी बचतीचे मोठे साधन आहे. त्यांचा मूळ पगाराचा काही भाग पीएफ फंडात जमा केला जातो आणि या रकमेवर सरकारही दरवर्षी व्याज देते. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी पीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता पीएफ खातेदाराला 8.15 टक्के दराने व्याज मिळणार आहे. EPFO ने मार्चमध्ये 2021-22 साठी EPF वरील व्याज 8.1 टक्के कमी केले होते. पीएफ खातेधारक गरज पडल्यास त्यांच्या खात्यात जमा केलेले पैसे सहज काढू शकतात. ईपीएफओ सदस्य त्यांच्या लग्नासाठी फंडातून आगाऊ रक्कमही काढू शकतात. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ... (Latest Marathi News)

EPFO Update
Pm Narendra Modi Latest Photo: 'टायगर प्रिंट' शर्ट परिधान करून पंतप्रधान मोदींची जंगल सफारी, पाहा फोटो

किती पैसे काढता येतील? (How Much Money Can Be Withdrawn from Pf?)

EPFO वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पीएफ सदस्य त्यांच्या लग्नासाठी FIF फंडातून आगाऊ पैसे काढू शकतात. याशिवाय सदस्य आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नासाठी आगाऊ पैसे काढू शकतो. तसेच त्यांच्या भावाच्या आणि बहिणीच्या लग्नासाठी देखील पीएफ फंडातून आगाऊ पैसे काढू शकतात.

सदस्य त्यांच्या फंडातील व्याजासह ठेव रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकतात. मात्र यासाठी भविष्य निर्वाह निधीचे सदस्यत्व सात वर्षांचे असावे, अशी अट आहे. (Pf News Today)

कितीवेळा पैसे काढता येतात? (How Many Times Money Can Be Withdrawn from Pf)

पीएफ खातेधारक लग्न आणि शिक्षणासाठी तीनपेक्षा जास्त वेळा आगाऊ पैसे काढू शकत नाहीत. तुम्ही घरबसल्या सहजपणे पीएफचे पैसे काढू शकता. ईपीएफओनुसार, तुम्ही केवळ 72 तासांत ऑनलाइन पैसे काढू शकता. त्याची ऑनलाइन प्रक्रिया खूप सोपी आहे. ऑनलाइन पैसे काढण्यासाठी तुमचे पीएफ खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. यासोबतच UAN क्रमांकही सक्रिय असावा लागतो.

EPFO पोर्टलवरून असं चेक करा बॅलन्स

  • EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा (www.epfindia.gov.in).

  • यानंतर ई-पासबुक या पर्यायावर क्लिक करा.

  • नवीन पेजवर UAN पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लॉगिन वर क्लिक करा.

  • लॉग इन केल्यानंतर, पासबुक पाहण्यासाठी सदस्य आयडी पर्याय निवडा.

  • आता तुम्हाला पासबुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळेल, जे डाउनलोड केले जाऊ शकते.

  • तुम्ही https://passbook.epfindia.gov.in/ वर जाऊन थेट पासबुक पाहू शकता.

  • यानंतर संपूर्ण माहिती तुमच्या समोर दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com