England Women Arrest : कबुतरांना खायला घालण्याची सवय आजीबाईंना पडली महागात; पालिकेने ठोठावला 2,62,840 रुपयांचा दंड
England Women Arrest
हल्ली शहरांमध्ये कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुबुतरांना खायला घालण्याचंही प्रमाण वाढलं आहे. अशाच प्रकारच्या एका घटनेमुळे इंग्लंडमधील एका ९७ वर्षीय वृ्ध्द महिलेवर महापालिकेने कारवाई केली असून तब्बल २,५०० म्हणजेच 2,62,840 रुपयांचा दंड ठोठावला आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी वृद्ध महिला कबुतरांना खायला घालत असल्याची तक्रार केली होती.
ॲन सागो या इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ९७ वर्षीय वृद्ध महिला आहेत. त्यांना कबूतर आणि सीगल या पक्ष्यांना खायला घालायला खुप आवडतं. त्या त्यांच्या घरातील बागेत पक्ष्यांना चारा खायला घालत होत्या. पण त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्यावर मोठ संकट आल्याचं कळतयं. माहितीनुसार, शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पालिकेने त्यांच्यावर १०० पौंड म्हणजेच सुमारे साडेदहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. काही काळाच्या कारवाई नंतर दंडाची रक्कम वाढून २,५०० पौंड म्हणजेच, 2,62,840 रुपये करण्यात आली आहे.
पक्ष्यांना खायला घालायला आवडतं...
ॲनी सागो या निवृत्त संगीत शिक्षिका आहेत. कारवाईनंतर ॲनी यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. ''माझ्या बागेत पक्षी येणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे''. परंतु पालिकेच्या याचिकेनुसार, पक्षी मोठ्या संख्येने चारा खाण्यास येत असल्याने परिसर प्रदूषित होतो. त्यामुळे परिसरातील इतर लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. काहीवेळा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान देखील होते. या कारणामुळे पालिकेने महिलेच्या या सवयीला समाजविघातक ठरवले आणि दंडाबरोबरच न्यायालयीन कारवाई देखील केली आहे.
कबुतरांच्या विष्ठेतून कोणते आजार पसरतात?
हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया
श्वसननिलिकेला सूज येणं
फुफ्फुसांना सूज येणं
क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (श्वसनमार्गाचे गंभीर आजार) यांसारखे गंभीर आजार
'श्वसन नलिकेला सूज आल्याने अस्थमाग्रस्त रुग्णांना गंभीर स्वरूपाचा शॉक येण्याची शक्यता असते,'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.