EMI पुन्हा महागणार? RBI रेपो दरात करणार मोठे बदल

३ ते ५ ऑगस्ट दरम्यान आरबीआय'ची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक होणार आहे.
RBI
RBISaam Tv
Published On

नवी दिल्ली: व्याजदरात पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे तुमचा ईएमआय (EMI) महाग होऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या ३ ते ५ तारखे दरम्यान, आरबीआयची (RBI) मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत आरबीआय रेपोरेटमध्ये २५ ते ५० बेसिस पॉईंटने वाढणार असल्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लोक घेणाऱ्यांचे ईएमआय महागणार असल्याचे बोलले जात आहे. (RBI Latest News)

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

विकसित देशांमध्ये मंदीच्या धोक्यामुळे वस्तूंच्या किंमती उतरल्या आल्या आहेत, ज्यामुळे महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. भारतीय तेल कंपन्यांसाठी कच्च्या तेलाच्या खरेदीची सरासरी किंमत प्रति बॅरल १०५.२६ प्रति डॉलरवर कायम आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे अडचणीत भर पडली आहे. आयात महाग झाली आहे. जून महिन्यात किरकोळ चलनवाढ आरबीआय ( RBI)नुसार ७.०१ टक्क्यांच्या वर राहिली आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेपो दरात ७५ बेसीसने वाढ होऊ शकते असा अंदार वर्तवला जात आहे.

RBI
Mamata Banerjee: महाराष्ट्रावर कब्जा केला, पण पश्चिम बंगाल...; ममता बॅनर्जींचे भाजपला चॅलेंज

आरबीआय (RBI) ऑगस्ट महिन्यात रेपो दरात २५ ते ५० बेसिस पॉइंट्सने वाढ करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची वाढ होऊ शकते असे बँक ऑफ बडोदाला वाटत आहे, तर एचडीएफसी बँकेच्या मते रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ करणे शक्य आहे. या आधी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात ९० आधार अंकांची वाढ केली आहे. सध्या रेपो दर ४.९० टक्के आहे. अनेक तज्ञ उच्च व्याजदर वाढविण्याचा इशारा देखील देत आहेत. व्याजदर आणखी वाढल्यास मागणी वाढण्यात अडचण निर्माण होईल आणि त्याचा फटका अनेक क्षेत्रांना बसू शकतो, असं अंदाज वर्तवला जात आहे.(RBI Latest News)

RBI
Satara : विसापूरच्या डबल मर्डर प्रकरणी साता-याच्या शनिवार पेठ, क-हाडच्या पार्लेतील युवकांना अटक

दरम्यान, देशातील महागाई कमी करणे हे आरबीआय समोरील मोठे आव्हान आहे. या अगोदर आरबीआयने महागाई आटोक्यात आणण्यासाठी दोनवेळा रेपो दरात बदल केले. त्यामुळे सध्या आरबीआय समोर हे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमिवर ऑगस्ट महिन्याच्या ३ ते ५ तारखे दरम्यान, आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजदरात पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे तुमचा ईएमआय (EMI) महाग होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com