Elon Musk : इलॉन मस्क ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्यास तयार, पण ठेवली 'ही' अट

ट्विटरची खरेदी केल्यापासून उद्योजक इलॉन मस्क चर्चेत
Elon Musk
Elon MuskSaam Tv

नवी दिल्ली - ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक धक्कादायक घोषणा केली आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचे ट्विट केले आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. त्यांनी ट्विट करून अशी माहिती दिली. इलॉन मस्क म्हणाले की, ट्विटरच्या (Twitter) सीईओ पदासाठी त्यांना कोणीतरी मिळताच ते पदाचा राजीनामा देतील. (Elon Musk Will Resign)

ट्विटमध्ये इलॉन मस्क म्हणाले की, नोकरी घेण्याइतपत कोणी वेडा भेटला की मी आपल्या सीईओ पदाचा राजीनामा देईन! त्यानंतर, मी फक्त सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमसोबत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विट करत नेटकऱ्यांना 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन असा प्रश्न विचारला होता त्यावर ५७.५ टक्के लोकांनी पद सोडा अस मत नोंदवलं होतं.

Elon Musk
Corona Updates : देशात पुन्हा कोरोना निर्बंध? चीनने टेन्शन वाढवलं; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

ट्विटर पोल घेत विचारला होता प्रश्न

१९ डिसेंबर रोजी पहाटे ४.५० वाजता इलॉन मस्क यांनी एक ट्विट केलं होत. या ट्विटमध्ये त्यांनी नेटकऱ्यांना 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. मस्क यांच्या या ट्विटरपोलवर एक कोटीहून अधिक लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली. मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा, या बाजूने ५७.५ टक्के लोकांनी मत केले तर ४२.५ टक्के लोकांनी राजीनाम्याच्या विरोधात मत दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com