Coronavirus Updates in India : गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला असून लाखो लोकांना घरात कैद करण्यात आलं आहे. ब्राझीलमध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. भारत सरकार अलर्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Latest Marathi News)
त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात (Corona Virus) नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची उपस्थिती असणार आहे. आज म्हणजेच बुधवारी (21 डिसेंबर) सकाळी 11:30 वाजता ही बैठक सुरू होईल.
एएनआय वृत्तसंस्थेना दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड 19 परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो. देशात सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 112 इतकी आहे.
काही महिन्यांपूर्वी देशात दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 4 कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. तर अनेकांनी या महामारीत आपला जीव गमावला आहे.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. झिरो कोविड पॉलिसी शिथिल होताच गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रुग्णांची आणि मृतांची संख्या इतकी वाढली आहे की, रुग्णालय आणि अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी मोठी लाट चीनमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात १० लाखांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीन संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.