Elon Musk: एलॉन मस्कची होऊ शकते हत्या? वडिलांना सतावतेय चिंता, काय आहे कारण?

Elon Musk : टेस्ला सीईओ एलॉन मस्क यांच्या वडिलांना त्यांच्या जिवाची चिंता सतावतेय. एलॉन मस्क यांच्या वडिलांनी एका माध्यमाशी बोलताना ही चिंता व्यक्त केलीय. रशिया आणि युक्रेनच्या युद्धावर सरकारचा निर्णय आणि युक्रेन सैनिकांना दिलेल्या स्टारलिंक टर्मिनलमुळे एलॉन मस्कच्या जिवाला धोका निर्माण झालाय. एका मुलाखतीत बोलताना एलॉन मस्क यांनी आपल्या मृत्यूविषयी शक्यताही वर्तवली होती.
Elon Musk Might be Assassinated
Elon Musk Might be AssassinatedSaam Tv

Elon Musk Might be Assassinated:

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कच्या (Elon Musk)वडिलांना त्यांची हत्या होऊ शकते, याची चिंता सतावतेय. अमेरिकेतील वृत्तपत्र 'द यूएस सन' ला एलॉनच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांनी 'द न्यू यॉर्कर' एका लेखावर टीका केली होती. या लेखात युक्रेन आणि रशियाच्या युद्धावर सरकारनं घेतलेल्या निर्णयांचा या परिणाम होऊ शकतो, याविषयी एलॉन मस्कनं आपलं मत मांडलं होतं. (latest News Elon musk)

'द न्यू यॉर्कर'ला पेंटागनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्कसोबत अनिर्वाचित अधिकारी सारखं वर्तन करण्यात आलं होतं. तसेच या वृत्तात युक्रेन युद्धात स्पेसएक्सच्या स्टारलिंक सॅटेलाईट किती महत्त्वपूर्ण होतं, हे सांगण्यात आलं होतं. एलॉन मस्कवर सरकारची वाईट नजर पडलीय. तसंच एलॉन मस्कसोबत व्लादिमीर पुतीन यांचे वर्तनही बदलले आहे. ही चिंता वाढवणारी गोष्ट असल्याचं एलॉन मस्कच्या वडिलांनी म्हटलंय.

Elon Musk Might be Assassinated
Elon Musk: एलन मस्कचा मोठा धमाका; X वरून ऑडिओ-व्हिडिओ कॉल करता येणार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे एलॉन मस्कच्या एका निर्णयावर नाराज आहेत. मागील वर्षी एलॉन मस्कनं स्पेसएक्सचे स्टारलिंक टर्मिनल हे युक्रेनी सैनिकांना दिलं होतं. मस्क यांचा हा निर्णय पुतीन यांना आवडला नव्हता. दरम्यान एका मुलाखती दरम्यान एलॉन मस्क विनोदात बोलताना म्हणाले, त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होऊ शकतो.

दरम्यान 'एक्स'मध्ये काम करणाऱ्या इंजिनीअरनं एका माध्यमाला सांगितलं की, मस्क हे आंघोळ करायला गेले तर दोन अंगरक्षक त्यांच्या बाथरूमबाहेर तैनात असतात. तसेच त्यांच्या कार्यालयातदेखील अंगरक्षक तैनात असतात. मे महिन्यात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यानुसार एक्स ऑफिसच्या बाजुलाच बाथरूम तयार करण्याची विनंती करण्यात आली होती. जेणेकरून एलॉन मस्क मध्यरात्री बाथरूमला जाणार असतील तर त्यांच्या सिक्योरिटी स्टाफ झोपेतून उठवण्याची गरज पडणार नाही.

Elon Musk Might be Assassinated
Elon Musk On Chandrayaan 3: चांद्रयान ३ मोहिमेचं बजेट हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी; इलॉन मस्क म्हणाला, मान गए इंडिया...

एलॉन मस्कचे मागील वर्षी एलॉन मस्क यांचे खासगी विमानाला ट्रॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेविषयीचा मुद्दा खूप चर्चेत आलं होता. ज्या पत्रकाराने सोशल मीडियावर एलॉन मस्क यांच्या खासगी जेटची लिंक शेअर केली होती. त्याला नोकरीवरुन निलंबित करण्यात आले होते. एलॉन मस्क यांनी त्या पत्रकारावर गंभीर आरोपही केले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने एलॉन मस्क यांच्या मुलाच्या कारचा पाठलाग केला होता. पाठलाग करणाऱ्याला संशय होता की, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क स्वत: त्या कारमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीने कारचा पाठलाग केला होता. याची माहिती खुद एलॉन मस्क यांनी दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com