Tesla's Share Price Rise : PM मोदींना भेटताच एलॉन मस्कने केली 82000 कोटींची कमाई, नेमकं काय घडलं?

Tesla's Share Price Rise after Elon Musk meets PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले. यादरम्यान पीएम मोदींनी अनेक सेलिब्रिटींची भेट घेतली.
Teslas Share Price Rise
Teslas Share Price RiseSaam Tv
Published On

Tesla's Stock Price Rise : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले. यादरम्यान पीएम मोदींनी अनेक सेलिब्रिटींची भेट घेतली. न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींनी टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला. इलॉन मस्क म्हणाले की, पंतप्रधान नेहमी गुंतवणुकीसाठी प्रेरित करतात.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क जेव्हा भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठकीमध्ये होते, तेव्हा त्यांच्या EV कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने उंचावत होते. ही बैठक भारतातील टेस्लाच्या भविष्याविषयीची तर होतीच, परंतु आता खुद्द एलॉन मस्क यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Teslas Share Price Rise
PM Modi-Elon Musk Meeting : 'मी मोदींचा फॅन...', मस्क यांच्याकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक; जॅक डोर्सींचा दावाही फेटाळला

एलॉन मस्क पीएम मोदी यांना आपला लकी चार्म मानत आहेत. कारण त्यांच्या या बैठकीनंतर समोर आलेला आकडा खरोखरच धक्कादायक आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समार्फत समोर आलेल्या अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या संपत्तीत सुमारे 10 अब्ज डॉलर म्हणजेच 82 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टेस्लाचे शेअर्स आणि इलॉन मस्क यांच्या संपत्तीचे (Wealth) आकडे किती, कसे आणि कोणत्या प्रकारचे आहेत हे पाहूयात.

टेस्ला शेअर्समध्ये प्रचंड वाढ -

मंगळवारी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी भारताचे पंतप्रधान ( Prime Minister) नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ज्यामध्ये टेस्लाच्या भारतात एंट्रीची चर्चा होतीच तसेच मस्क यांनी स्वतः भारतात येण्यास होकार देऊन लवकरात लवकर भारतात प्लांट उभारण्याबाबत सांगितले.

त्याच दरम्यान, टेस्लाच्या शेअर्सनी भरारी घेतली असल्याचे दिसून आले. टेस्लाचे शेअर्स US स्टॉक मार्केट इंडेक्स Nasdaq वर 5.34 टक्क्यांनी वाढून $274.45 वर बंद झाले. या वेळी, कंपनीचा स्टॉक $ 274.75 वर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 21 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून 2023 मध्ये 166 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Teslas Share Price Rise
Twitter's New Look : Twitter च नवं लूक ! Elon Musk ने केला ट्विटरचा काया पालट, WhatsApp सारखे फीचर केले लाँच

82 हजार कोटींची संपत्ती -

टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे एलॉन मस्कच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी मस्कच्या संपत्तीत 9.95 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 82 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 243 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

जर सोमवार आणि मंगळवार एकत्र केले तर मस्कच्या एकूण संपत्तीत दोन दिवसात $13 अब्ज पेक्षा जास्त वाढ झालेली दिसते. दुसरीकडे, जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती अर्नॉल्ट बर्नार्ड यांच्या संपत्तीत $ 5.75 अब्जची घट झाली आहे आणि त्यांची एकूण संपत्ती $ 200 बिलियन वरून $ 197 बिलियनवर आली आहे.

Teslas Share Price Rise
Elon Musk : एलन मस्कने केली ट्विटरच्या नव्या सीईओची घोषणा? फोटो शेअर करत दिली माहिती

यावर्षी 106 अब्ज डॉलरची वाढ झालेली असून एलॉन मस्कने वाढत्या संपत्तीच्या बाबतीत इतिहास रचला आहे. 2023 मध्ये मस्कने त्यांची संपत्ती 106 अब्ज डॉलरने वाढवली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगातील 9व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत उद्योगपती सेर्गे ब्रिन यांची संपत्ती $106 अब्ज आहे.

त्यानंतर कोणत्याही बिजनेसमॅनची (Businessman) एकूण संपत्ती या पातळीवर आलेली नाही. अगदी मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती 104 अब्ज डॉलर आहे, जो जगातील 10 व्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योगपती आहे. तज्ज्ञांच्या मते, लवकरच एलॉन मस्क $ 250 अब्जची पातळी ओलांडू शकतो अशी शक्यता आहे देण्यात आली आहे. या वर्षी त्याच्या आजीवन निव्वळ संपत्तीचा विक्रम $340 अब्ज पार करू शकेल, जो त्याने नोव्हेंबर 2020 मध्ये केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com