EVM बाबत निवडणूक आयोगाने आमच्या शंकांचं निरसन करावं, शरद पवारांसह विरोधकांंची मागणी

ईव्हीएम मशीनबाबत देशवासियांच्या मनात शंका आहे.
Opposition Leader
Opposition LeaderSaam TV
Published On

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम रिमोट मशीनबाबत घेतलेल्या निर्णयासंदर्भात विरोधी पक्षाची राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी असं म्हटले होते की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) अचूक असली पाहिजेत आणि त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल कोणतीही शंका निवडणूक आयोगाने दूर केली पाहिजे.

या बैठकीनंतर बोलाताना शरद पवार यांनी म्हटलं की, आम्ही ईव्हीएम मशीनबाबत काही प्रश्न, शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली पाहिजेत. (Political News)

Opposition Leader
Amritpal Singh : पंजाबला हादरवणारा अमृतपाल सिंग फरार; महाराष्ट्रात का दिलाय अलर्ट, काय आहे शक्यता?

दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, ईव्हीएम संदर्भात काही आक्षेप आहेत. देशवासियांच्या मनात शंका आहे. यात गडबडी करता येऊ शकते. अनेक प्रश्न आहेत ज्याचे उत्तर निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे. आमच्या मनातील संभ्रम दूर व्हायला पाहिजे.

Opposition Leader
Sangli News: राज ठाकरेंचा अल्टीमेटम अन् सांगली महापालिका अधिका-यांची पळापळ, महापालिका आयुक्तांनी घेतला 'हा' निर्णय

कपिल सिब्बल यांनी म्हटलं की, ही पहिली वेळ नाही आम्ही आमचं म्हणणं निवडणूक आयोगाकडे मांडलं आहे. ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग होऊ शकतो असं आम्ही अनेकदा म्हटलंय. ईव्हीएम मशीनमध्ये जेव्हा जेव्हा तांत्रिक बिघाड होतो, तेव्हा मत भाजपला जातं, हा भ्रम राजकीय पक्षांपुरता मर्यादिल राहिलेला नाही. सर्वसामान्य जनतेलाही असं वाटू लागलं आहे. मात्र आजपर्यंत निवडणूक आयोगाने याबाबत उत्तर दिलेलं नाही.

आता आम्ही पुन्हा निवडणूक आयोगाकडे शेवटचं जाणार आहोत. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाची लिखित स्वरुपात उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत. जेणेकरुन ईव्हीएमबाबत कोणताही संशय राहणार नाही. मात्र निवडणूक आयोगाने योग्य त्या पद्धतीने उत्तरे दिली नाहीत तर आणि सर्वजण पुढे काय करायचं हे ठरवू, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com