Eknath Shinde News : पराभव ही सामूहिक जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर CM शिंदेंची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस माझे सहकारी असून त्यांच्याशी बोलेन, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पराभव ही सामूहिक जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर CM शिंदेंची प्रतिक्रिया
Maharashtra Politics cm eknath shinde reaction on devendra fadnavis Saam TV

मुंबई : राज्यात महायुतीला मोठ्या परभवाला सामोरे जावं लागलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. राज्यात भाजपला २८ जागापैकी ९ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. 'मला मंत्रिमंडळातील जबाबदारीतून मुक्त करावे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. निकालानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला पोहोचले आहेत. या बैठकीआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यंत्री शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर भाष्य केलं. 'निवडणुका अनेक होतात. या निवडणुकांमध्ये यात यश आणि अपयश असतं. आम्ही यश-अपयशाने खचून जाणारे कार्यकर्ते नाही. आमची ही सामूहिक जबाबदारी आहे. या निवडणुकीत जागा कमी झाल्या तरी मते काही ठिकाणी वाढली आहेत. मोठ्या प्रमाणात मतदार आमच्यासोबत राहिला'.

पराभव ही सामूहिक जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर CM शिंदेंची प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil News | लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला? उत्तर मिळालं..

'दिशाभूल केला. चुकीचा प्रचार केला. संविधान बदलण्याची भीती निर्माण केली. एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं. या प्रकारे ही मते मिळवली. ही तात्पुरती मते आहेत. या नेत्यांनी व्होटबँकेचे राजकारण केलं. या नेत्यांचे खरे चेहरे समोर येतील. या नेत्यांनी पसरवलेला संम्रभ दूर करण्यास कमी पडलो. आम्ही विकासाचं राजकारण करतो. आम्ही एक टीम म्हणून काम करतो, असे शिंदे म्हणाले.

पराभव ही सामूहिक जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर CM शिंदेंची प्रतिक्रिया
Minister Who Lost In Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; १९ मंत्र्याचा झाला पराभव, पाहा लिस्ट

'आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन काम करतो. मोदीजी आणि राज्य सरकार एक टीम म्हणून काम करतो. या विकासाच्या अजेंड्याला मोदी हटाव मोदी हटाव असं म्हटलं. त्याला लोकांनी नाकारलं. देशातील जनतेला एनडीए सरकारला बहुमत दिलं आहे. त्यामुळे देशात लवकरच सरकारचं स्थापन होईल. त्यांचं अभिनंदन करतो. आम्ही टीम म्हणून काम करतो. मी त्यांच्याशी बोलेल, असे शिंदे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com