नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वरिष्ठांच्या आशीर्वादासाठी सदिच्छा भेट घेतली. तसेच मुंबईत गेल्यावर राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ( Eknath Shinde News In Marathi )
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, 'नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादासाठी सदिच्छा भेट घेतली. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सदिच्छा भेट घेणार आहोत. या भेटीमागे कोणताही राजकीय अजेंडा नाही. सर्वसामान्य लोकांच्या मनातील सरकार अशी भूमिका घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे वरिष्ठांच्या सदिच्छा भेटीसाठी आलो आहोत. आमचं सरकार लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे आशीर्वाद आवश्यक आहेत. राज्याच्या विकासासाठी नरेंद्र मोदींचे व्हिजन समजून घेणार आहोत'.
'राज्यातील संपूर्ण घडामोडीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आशीर्वाद लाभले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आशीर्वाद लाभले. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते राज्य सरकाच्या पाठिशी आहेत. खासकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापनेमध्ये महत्वाचा वाटा आहे. ज्या राज्याला केंद्राचं सहकार्य मिळतं, त्या राज्यात विकास लवकर होतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
'राज्यात आमचं सरकार स्थापन झाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, जलशिवार योजना, शेतकऱ्यांच्या लोकहिताचे प्रकल्प पुन्हा पुढे नेणार आहोत. राज्याला चांगले दिवस आणण्याचे प्रयत्न करू. आमचं सरकार अडीच वर्ष टिकेल. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नको. हीच आमची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून राज्याचे तीन तुकडे करण्याचं नियोजन सुरू आहे, असा आरोप करण्यात आला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले,'लोकांची दिशाभूल केली जात आहे. मुंबई, राज्यातील जनता सुज्ञ आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.