Veena Vijayan: केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्या मुलीवर ईडीने दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?

Kerala News: ईडीने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
Veena Vijayan
Veena VijayanSaam Tv
Published On

Kerala News:

ईडीने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मालकीच्या आयटी कंपनीसह अन्य काही लोकांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे संपूर्ण प्रकरण वीणा आणि त्यांच्या कंपनीला एका खाजगी खनिज कंपनीने केलेल्या कथित बेकायदेशीर पेमेंटशी संबंधित आहे. ईडीची टीम लवकरच त्यांचीचौकशी करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Veena Vijayan
Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

याप्रकरणी सूत्रांनी माहिती दिली आहे की, ईडीने मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि संबंधित लोकांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण आयकर विभागाच्या तपासावर आधारित आहे. ज्यात आरोप आहे की, खासगी कंपनी कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेडने (CMRL) 2018 ते 2019 या कालावधीत वीणाच्या कंपनी - एक्झालॉजिक सोल्युशन्सला 1.72 कोटी रुपयांचे बेकायदेशीर पेमेंट केले. ही रक्कम घेतल्यानंतर आयटी फर्मने कंपनीला आपली कोणतीही सेवा दिली नव्हती.

Veena Vijayan
Lok Sabha Election 2024: मतदारांना प्रलोभन देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर होणार कारवाई, या टोल फ्री क्रमांक करता येईल तक्रार

दरम्यान, मागील महिन्यात वीणा विजयन यांच्या कंपनी एक्झालॉजिक सोल्युशन्सने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसएफआयओने सुरू केलेला तपास थांबवण्याची मागणी केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com