Delhi-NCR Earthquake: दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले; लागोपाठच्या धक्क्यांनी जमीन थरथरली

या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या खाली 5 किमी अंतरावर असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ;दिली आहे.
Earthquake
EarthquakeSaam Tv

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Delhi Earthquake News: देशाची राजधानी नवी दिल्लीला भूकंपाचे हादरे बसले आहे. नवी दिल्लीपासून पश्चिमेला ८ किमी अंतरावर आज, मंगळवारी रात्री ९.३० वाजता २.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे (Earthquake) केंद्र जमिनीच्या खाली 5 किमी अंतरावर असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. (Earthquake of magnitude 2.5 strikes Delhi)

राजधानी दिल्ली (Delhi) भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. या महिन्यात भूकंपाचे धक्के बसल्याची ही दुसरी घटना आहे. याच महिन्यात १२ नोव्हेंबरलही दिल्ली रात्री साधारण ८ वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल होती.

Earthquake
Palghar Crime Video: धक्कादायक! धावत्या बसमध्ये प्रवाशाची गळा चिरुन हत्या; पालघरमधील घटनेने खळबळ

राजधानी दिल्लीसह (Delhi) शेजारी राष्ट्र नेपाळ येथे देखील ९ नोब्हेंबरला भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपात नेपाळमध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरच्या रात्री १.५७ वाजता राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते.

सदर भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू नेपाळचं मणिपूर शहर होतं. या भूकंपाचा प्रभाव भारतात उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड या राज्यात पाहायला मिळाला होता. त्यानंतर शनिवारी, १२ नोव्हेंबरलही पुन्हा एकदा रात्री ८ वाजता भूकंपाची धक्के जाणवले. आता पुन्हा २.५ २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. याबाबत प्रशासन आणखी माहिती माहिती घेत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com