Iran Earthquake: इराण आज भूकंपाच्या तीव्र झटक्याने हादरला.तुर्की-इराण सीमेजवळील वायव्य इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील खोय शहराला शनिवारी रात्री ५.९ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे इराणच्या प्रांतीय राजधानीत अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
इराणी मीडिया आणि युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) यांनी याबाबत माहिती दिली आहे. इराणच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 440 लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंपग्रस्त भागाच्या आसपासच्या भागातही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Latest News)
भूकंपामुळे खोय शहरातील काही इमारतींचे नुकसान झाले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 एवढी होती आणि त्याचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल होती आणि इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतात जास्त होती.
इराणी मीडियाने इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, भूकंपग्रस्त भागात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत, तर रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.