Karnataka News : कर्नाटक राज्यातील प्रवाशासाठी नव्या वर्षाच्या सुरवातीलाच एक चांगली बातमी आहे. बेंगळुरू आणि म्हैसूर, शिमोगा, दावणगेरे, चिक्कमंगलुरू, विराजपेटे आणि मडीकेरे दरम्यान नव्याकोऱ्या पर्यावरण पुरक ई-बसेस आता धावू लागतील. त्यामुळे कर्नाटकातील नागरिकांना प्रदुषण मुक्त प्रवास अनुभवताना येणार आहे. (Latest Marathi News)
भारतीय ई-बसेस मोबीलीटीमधील आघाडीची कंपनी Olectra Greentech Limited (OGL) आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) यांच्या सहकार्यातून हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला आहे. 12-मीटर वातानुकूलित बसेसची आसन क्षमता 43 + 1 चालक अशी आहे. इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशनमूळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळते.
प्रत्येक ई-बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, आपत्कालीन बटण, अग्निशामक उपकरण, प्रथमोपचार किट आणि तातडीच्या प्रसंगी वापरायचा हातोडा यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हाय-पॉवर फास्ट चार्जिंग सिस्टम 2-3 तासांमध्ये बॅटरी पूर्णपणे रिचार्ज करते. ई-बस एका चार्जवर वाहतूक आणि प्रवासी भार या परिस्थिती या नुसार 300 किमी पर्यंत प्रवास करू शकते.
ई-बसमध्ये आरामदायी लक्झरी पुश-बॅक सीट आहेत. टीव्ही आणि इन्फोटेनमेंट यंत्रणा, प्रत्येक आसनाला USB चार्जर आणि सामान ठेवण्याची प्रशस्त जागा अशा सुविधा आहेत .ऑलेक्ट्राने आजपर्यंत विविध राज्यांमध्ये 1,000 हून अधिक बसेस वितरित केल्या आहेत. ऑलेक्ट्रा बसच्या मनाली ते रोहतांग पास या डोंगराळ भागात प्रवास करण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे.
के.व्ही. प्रदीप, सीएमडी, ऑलेक्ट्रा यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) उपक्रमातर्फे या ऑलेक्ट्रा ई-बसेस राज्यभरातील 7 डेपोतून आपली प्रदुषणरहित, आरामदायी, आवाजरहित सेवा देण्यास सज्ज असल्याचे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.