Nashik Latest News: डिजिटल करन्सीला प्रेस कामगारांनी विरोध दर्शवला आहे. डिजिटल करन्सीमुळे देशाची अर्थव्यवस्था, सुरक्षा तसेच बॅंकींग आणि नोट प्रेस क्षेत्रातील रोजगार धोक्यात येईल. सायबर हल्ले आणि सायबर क्राइम वाढून नागरिकांनाही फटका बसेल, असं प्रेस कामगारांचं म्हणणं आहे. त्यामुळे डिजिटल करन्सीला विरोध करण्यासाठी देशभरात व्यापक जनजागृती केली जाणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली आहे. (e-RUPI Digital Currency News)
देशात नाशिकरोड, देवास, सालबोनी आणि म्हैसूरला चलनी नोटांची छपाई होते. ऑनलाईन व्यवहारामुळे नोटांचा वापर कमी होत असून नोटांच्या प्रेसवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. डिजिटल करन्सीचे (Digital Currency) फायद्यापेक्षा तोटेच जास्त असून क्रिप्टो करन्सीवर कोणाचेच नियंत्रण नाही. भारतात ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. देशात तज्ञ सायबर पोलिसांची टंचाई आहे. देशात सायबर सिक्युरिटीचे जाळे मजूबत नाही. याचा गैरफायदा चीन, पाकसारखे शत्रू देश घेऊन सायबर हल्ल्याद्वारे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकतात. तसेच ही करन्सी भविष्यात घातक ठरू शकते. (Latest Marathi News)
सरकारने डिजिटल आणि क्रिप्टोचे परिणाम आधी तपासावेत, अशी मागणी प्रेस कर्मचाऱ्यांनी केली आहे. डिजिटल करन्सीमुळे भारतातील रोजगार धोक्यात येणार असून प्रेस कामगारांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे डिजिटल करन्सीला त्यांनी विरोध दर्शवला आहे.
एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर खिशातून पैसे काढून देण्याऐवजी आपण फोन काढतो, कोड स्कॅन करतो आणि पेमेंट करतो. थोडक्यात UPI पेमेंट, इंटरनेट बँकिंगचा वापर म्हणजेच डिजिटल करन्सी होय. भारतीय रिझर्व्ह बँकेने 'डिजिटल रूपी' हे नवं डिजिटल चलन लागू केलं आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराचं एक नवं माध्यम उपलब्ध होणार आहे. यात आता डिजिटल रुपयाचीही भर पडणार आहे.
डिजिटल रुपी हे एक व्हर्चुअल म्हणजे आभासी चलन आहे. डिजिटल रुपीचं मूल्य आपल्या नेहमीच्या रुपयाइतकंच आहे. म्हणजे एका रुपयाच्या मोबदल्यात तुम्ही एक डिजिटल रुपी विकत घेऊ शकता.
डिजिटल रुपी हा एक प्रकारे चलनी नोटांचा डिजिटल अवतारच आहे. पण या डिजिटल रूपीचा वापर तुम्हाला केवळ ऑनलाईन स्टोरमध्येच करता येईल. किरकोळ (रिटेल) आणि घाऊक (होलसेल) स्वरुपात डिजिटल रुपया उपलब्ध असेल.रिटेल स्वरुपात डिजिटल रुपी सर्वांना वापरता येईल. तर होलसेल स्वरुपातील डिजिटल रुपी केवळ निवडक बँका आणि वित्तीय संस्थांना बँकांअंतर्गतच्या व्यवहारासाठी वापरता येईल.
आरबीआयनं सध्या प्रायोगिक तत्वावर होलसेल डिजिटल रुपी लाँच केला असून सध्या नऊ बँकाच त्याचा वापर करू शकतील. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, आयडीएफसी फर्स्ट आणि एचएसबीसीचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.