दारू पार्टीत नको ते घडलं; मित्रांनी प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा, तरुण थेट ICU मध्ये

uttar pradesh shocking : तीन मित्रांच्या दारू पार्टीत नको ते घडल्याची घडलं. मित्रांनी प्रायव्हेट पार्टमध्ये हवा भरल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.
uttar pradesh shocking news
uttar pradesh shocking Saam tv
Published On
Summary

ग्रेटर नोएडामध्ये घडला भयकंर प्रकार

दारू पार्टीत मस्करीची झाली कुस्करी

दोघांनी तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. रबूपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका खासगी कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या दारू पार्टीत भयंकर प्रकार घडला. सफाई कर्मचाऱ्यांनी पार्टीत प्रायव्हेट पार्टमध्ये कंप्रेसर पाइप टाकून हवा भरल्याची घटना घडली आहे. हवेच्या उच्च दाबामुळे तरुणाची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

uttar pradesh shocking news
Pune Crime: पुण्यात जनगणान करायला आलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत भयंकर घडलं, १० ते १५ जणांकडून शिवीगाळ करत मारहाण

टीव्ही९ रिपोर्टनुसार, ग्रेटर नोएडा येथील 'सूर्य ग्लोबल फ्लेक्सी फिल्म' नावाच्या कंपनीत उत्तरांखडच्या काशीपूरमध्ये राहणारे तिघे सफाई कर्मचारी काम करत होते. या तिघांनी दारू पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीदरम्यान झालेला कचरा एक कर्मचारी वाकून सफाई करत होता. त्याचवेळी दोन सफाई कर्मचाऱ्यांनी मस्करीत त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कंप्रेसर पाइपने हवा भरली.

उच्च दाबामुळे पीडित कर्मचाऱ्याच्या पोटात हवा गेली. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. काही वेळानंतर त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमी कर्मचाऱ्याला आधी कैलाश रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याच्या पोटातील आतड्या फाटल्याचे समोर आलं. त्यामुळे पुढील शस्त्रक्रियेसाठी ग्रेटर नोएडाच्या यथार्थ रुग्णालयात दाखल केलं. पीडित कर्मचारी सध्या ICU मध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

uttar pradesh shocking news
Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

समीर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी दोन्ही सहकारी जीशान, दिलशाद यांना अटक केली. रबूपुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ कारवाईला सुरूवात केली आहे. कंपनीच्या मॅनेजरच्या जबानीवरून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com