
फरिदाबाद - येथील सेक्टर-80 डिस्कव्हरी सोसायटीमध्ये २३ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी बीपीटीपी पोलिसांनी डीपीएस शाळेच्या मुख्याध्यपिका ममता गुप्ता यांना अटक (Arrest) केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलीस (Police) आता सुसाईड नोटचे हस्ताक्षर जुळवण्याचे काम करत आहेत. याबाबत शाळेकडून रेकॉर्ड घेण्यात आला आहे.
आरवी मल्होत्रा या दहावीच्या विद्यार्थ्याने सोसायटीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी मुख्याध्यापिका ममता गुप्ता यांची तब्बल ३ तास चौकशी केली. आरवी मल्होत्राने त्याच्या सुसाईड नोटमध्ये ममता गुप्ता यांचे नाव लिहिले होते. पोलिसांनी नोटीस देऊन ममता गुप्ता यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते, तेथे बंद खोलीत महिला पोलिसांच्या उपस्थितीत तिची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर तिला घरी पाठवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरा तिला अटक करण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास या मुख्याध्यापिकेला कर्तव्य दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आरवीचे कुटुंबीय सतत ममता यांच्या अटकेची आणि शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. याबाबत रविवारी तपास अधिकारी सोसायटीतही गेले होते. त्यांनी आरवीची आई आरती यांना विचारणा केली होती. पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरवी मल्होत्राची नोटबुकही जप्त केली असून सुसाईड नोटसह तज्ज्ञांकडे पाठवली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.