ज्युनिअर ट्रम्प पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार, व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या मुलाचा साखरपुडा

Trump Family Wedding Buzz: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात आणखी एक सून येणारंय. ज्युनिअर ट्रम्प पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात येणारी ही नवीन सूनबाई आहे तरी कोण?
Donald Trump Jr. with his fiancée Bettina Anderson during a private engagement event.
Donald Trump Jr. with his fiancée Bettina Anderson during a private engagement event.Saam Tv
Published On

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे कारण त्यांच्या लाडक्या लेकाचं पुन्हा लग्न जुळलंय. ज्युनिअर डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पाम बीचमधील प्रसिद्ध सोशलाईट बेटिना अँडरसन हिच्यासोबत त्यांचा साखरपुडा पार पडला. ज व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका खास कार्यक्रमात त्यांनी ही गोड बातमी जगाला दिली.

कोण आहे बेटिना अँडरसन?

सुप्रसिद्ध समाजसेवक हॅरी लॉय अँडरसन ज्युनियर आणि इंगर अँडरसन यांची मुलगी

पाम बीचच्या सामाजिक वर्तुळात अत्यंत सक्रिय

'होप फॉर डिप्रेशन रिसर्च फाऊंडेशन' आणि 'प्रोजेक्ट पॅराडाइज' संवर्धन मोहिमेत महत्त्वाची भूमिका

गेल्या महिन्यात राजस्थानात एका लग्नासाठी हजेरी

भारत दौऱ्यानंतर दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा

व्हेनेसा ट्रम्प हिच्यासोबत ट्रम्प ज्युनियर यांचं पहिलं लग्न

व्हेनेसा आणि ज्युनिअर ट्रम्प यांना पाच मुलं

फॉक्स न्यूजच्या माजी होस्ट किम्बर्ली गिलफॉयल हिच्यासोबत नाव

2024 मध्ये दोघांचं नातं संपुष्टात

साखरपुड्याची घोषणा करताना ज्युनिअर ट्रम्परने बेटिनाचे खास आभार मानले. तिने होकार दिल्यामुळेच हे शक्य झालं असं सांगत त्यांनी तिला धन्यवाद दिले आहेत तर हा आपल्या आयुष्यातील सर्वात अवस्मरणीय काळ असल्याची प्रतिक्रिया बेटिनानं दिलीय. आता बेटिना आणि ज्युनिअर ट्रम्प यांचा विवाह सोहळा शाही पद्धतीने होते की साधेपणानं हेच पहावं लागणारंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com