Dogs Breeds : मोठी बातमी! पाळीव कुत्र्यांच्या २३ प्रजातींवर बंदी; मोठं कारण आलं समोर

Dogs Breeds Banned : पिटबुल, रॉटलविअर, बुलडॉग यासारख्या विदेशी कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारही याबाबतीत जागृत झाले असून अशा आक्रमक प्रजातींवर बंदी घालण्यात आली आहे.
Dogs Breeds
Dogs Breeds Saam Digital
Published On

Dogs Breeds

श्‍वान हा जितका प्रेमळ असतो, तितकाच तो घातकही ठरतो. भटक्या आणि पाळीव श्‍वानांमध्ये प्रसंगानुरूप आक्रमकता असते; मात्र काही प्रजाती अशा आहेत की, आक्रमकता हा त्यांचा स्वभावधर्म आहे. पिटबुल, रॉटलविअर, बुलडॉग यासारख्या विदेशी प्रजाती काही प्रसंगी आपल्या मालकांवरसुद्धा हल्ला करतात. त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारही याबाबतीत जागृत झाले असून अशा आक्रमक प्रजातींवर बंदी घालण्यात आली आहे.

घातक विदेशी २३ प्रजातींच्या श्‍वानाची आयात करणे, पाळणे, त्याची विक्री आणि पैदास यावर आळा घालण्यात आला आहे. असे श्‍वान मानवासाठी घातक असून दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकांनी आधीच पाळलेल्या या जातीच्या कुत्र्यांची नसबंदी करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २०२३ मध्ये भटक्या तसेच पाळीव श्‍वानदंशांच्या लाखो घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये महाराष्‍ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात २०२३मध्ये चार लाख ३५ हजार घटना घडल्या आहेत; तर सर्वांत कमी नागालँडमध्ये ५६९ घटना घडल्या आहेत. त्यामुळे घातक असणाऱ्या पाळीव व भटक्या श्‍वानांच्या नसबंदीची प्रभावी अंमल-बजावणी करणे अत्यावश्यक बनले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कुत्र्यांच्या प्रजातींवर बंदी

1. पिटबुल टेरियर

2. टोसा इनु

3. अमेरिकन स्टेफोर्डशायर टेरियर

4. फिला ब्रासीलीरो

5. डोगो अर्जेंटीनो

6. अमेरिकन बुलडॉग

7. बोअरबोएल कांगल

8. मध्य एशियाई शेफर्ड डॉग

9. कोकेशियन शेफर्ड डॉग

10. दक्षिण रूसी शेफर्ड डॉग

11. टॉर्नजैक

12. सरप्लानिनैक

13. जापानी टोसा

14. अकिता

15. मास्टिफ

16. टेरियर्स

17. रोडेशियन रिजबैक

18. वुल्फ डॉग

19. कैनारियो

20. अकबाश डॉग

21. मॉस्को गार्ड डॉग

22. केन कोर्सो

23. बैंडोग

Dogs Breeds
Mamata banerjee injured : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत, कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु

वर्षभरातील काही गंभीर घटना

११ मार्च २०२४ : उत्तर प्रदेशात पिटबुलच्या हल्ल्यात दोन वर्षांचा मुलगा जखमी.

ऑक्टोबर २०२३ : हरियानातील हिस्सारमध्ये पिटबुलचा मुलीवर हल्ला. मुलीच्या पोटावर, पायाला आणि शरीराच्या इतर भागावर चावा.

जुलै २०२३ : हरियानात एका महिलेचा पिटबुलने चावा घेतला. त्याने तिचा पाय तब्बल पाच मिनिटे जबड्यात पकडला होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर तिची सुटका.

जुलै २०२३ : उत्तर प्रदेशात पिटबुलने त्याच्या मालकावर हल्ला केला.

जानेवारी २०२३ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका रॉटवेलर कुत्र्याने पंजाबी अभिनेता रोहित (२३) याच्या हाताला व पायाला चावा घेतला. त्याच्या चेहऱ्यावर, हाताला आणि पायाला अनेक जखमा झाल्या होत्या.

राज्यनिहाय सर्वांत जास्त कुत्रा चावलेल्यांची संख्या (२०२३)

महाराष्ट्र - ४,३५,१३६

तमिळनाडू - ४,०४,४८८

गुजरात - २,४१,८४६

बिहार - २, १९,०८६

उत्तर प्रदेश - २,१८,३७९

कर्नाटक - २,०८,६५६

या राज्यांत सर्वांत कमी

अरुणाचल प्रदेश - ३,७५७

मणिपूर - २,५११

लडाख - २,३१६

मिझोराम - १,०३५

नागालँड - ५६९

सहा वर्षांतील महाराष्ट्रातील आकडेवारी

२०२३ - ४,३५,१३६

२०२२ - ४,४३,३८५

२०२१ - ४,७७,१३३

२०२० - ३,४७,७८१

२०१९ - ६,७९,३३६

२०१८ - ६,६३,०९४

Dogs Breeds
Punjab Central Jail prisoners Attack : पंजाबच्या मध्यवर्ती कारागृहाचा कैद्यांनी घेतला ताबा, पाच जिल्ह्यातील पोलिसांना केलं पाचारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com