Dog Attack: चेहरा, गळा अन् पोट फाडले, जर्मन शेफर्ड कुत्र्याने महिलेचा जीव घेतला

Kanpur: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका वृद्ध महिलेवर पाळीव कुत्र्याने हल्ला केला. तो कुत्रा जर्मन शेफर्ड होता, ज्याने महिलेला खूप ओरबाडले. यामुळे महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
German Shepherd
घरात कुत्रा पाळताय तर वेळीच व्हा सावध! कानपूरमध्ये पाळीव कुत्र्याने केलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यूGoogle
Published On

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याने घरातील ९१ वर्षीय वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने महिलेला गंभीररित्या ओरबाडले आणि तिच्या चेहऱ्यावर, मानेवर, पोटावर तसेच शरीराच्या इतर भागांवर चावा घेतला. या भीषण हल्ल्यामुळे महिलेचा वेदनेने मृत्यू झाला. ही वृद्ध महिला तिच्या सून आणि नातवासोबत राहत होती. तिच्या नातवाने जर्मन शेफर्ड कुत्रा पाळला होता.

ही घटना घडल्यानंतर लगेचच नियंत्रण कक्षाने महापालिकेला या प्रकरणाची माहिती दिली. महापालिकेचे पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुत्र्याला आपल्या ताब्यात घेतले. कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलेच्या मृत्यूनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.

German Shepherd
Dog Attack : पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; सहा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी, मुरबाड तालुक्यातील घटना

जर्मन शेफर्ड घरीच वाढले

ही घटना विकास नगर येथे घडली, जिथे जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात मोहिनी त्रिवेदी नावाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मृत महिला तिची सून किरण आणि नातू धीर प्रशांत द्विवेदी यांच्यासोबत राहत होती. प्रशांतने स्वतः घरी जर्मन शेफर्ड कुत्रा पाळला होता. अलिकडेच, प्रशांत आणि त्याच्या आईला अपघात झाला होता, ज्यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला होता.

वृद्ध महिलेचा मृत्यू

ही घटना १४ मार्च रोजी घडली. प्रशांत आणि त्याची आई किरण आपल्या खोलीत आराम करत असताना, प्रशांतची आजी मोहिनी घराच्या अंगणात गेल्या. त्या ठिकाणी आधीच जर्मन शेफर्ड कुत्रा उपस्थित होता. मोहिनी आजींना पाहताच तो कुत्रा भुंकू लागला. त्यामुळे त्या घाबरल्या, आणि काही क्षणातच कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मोहिनी आजी गंभीर जखमी झाल्या व रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Edited By - Purva Palande

German Shepherd
Dogs Barking: रात्रीच्या वेळी कुत्रे का भुंकतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com