JNU News Updates,  ABVP News
JNU News Updates, ABVP NewsSaam Tv

जेएनयूमध्ये 'नॉनव्हेज' खाण्यावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद; जाणून घ्या काय आहे प्रकरण

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) सदस्यांनी मेस सेक्रेटरीला मारहाण केली आणि कर्मचार्‍यांना वसतिगृहात मांसाहारी जेवण देण्यापासून रोखले, असा आरोप (जेएनयुएसयू) JNUSU ने आरोप केला आहे.
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कॅन्टीनमध्ये मांसाहर देण्यावरुन रविवारी दुपारी विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला. ही घटना जेएनयुच्या कावेरी हॉस्टेलमध्ये घडली. एबीव्हीपी (ABVP) आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (JNUSU) यांच्यात वाद झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) सदस्यांनी मेस सचिवाला मारहाण केली आणि कर्मचार्‍यांना वसतिगृहात मांसाहारी जेवण देण्यास रोखले असा आरोप स्टुडंट्स युनियनने केला आहे. (JNU News Updates)

वसतिगृहात पूजा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असल्याची आरोप आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. यात काही विद्यार्थी जखमी केल्याचा आरोपही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणताही हिंसाचार झालेला नाही. यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. ही घटना घडताच विद्यापीठ प्रशासनाने लगेच पोलिसांना (Police) बोलवले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) सदस्यांनी यावेळी मारहाण केल्याचा आरोप स्टुडंट युनियनने केला आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी जेवणाचा मेनू बदलून त्यामधील नेहमीचा मांसाहार बंद करण्याबद्दल ते मेस कमिटीवर दबाव टाकत होते, असाही आरोप स्टुडंट युनियनने केला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने स्टुडंट युनियनचे आरोप फेटाळले आहेत. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर दुपारी ३.३० वाजता काही विद्यार्थ्यांनी कावेरी वसतिगृहात पूजा व हवन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या पूजेत जेएनयूचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी या पूजे दरम्यान आंदोलन, अडथळा आणि पूजा बंद करण्यासाठी तेथे आले होते. यावेळी या विद्यार्थ्यांनी नॉनव्हेज जेवनाच्या मुद्द्यावरुन गोंधळ निर्माण केला असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला आहे.

Edited By -Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com