PM Modi : काँग्रेसने 'महादेव'लाही सोडलं नाही; भ्रष्टाचारानं यांनी तिजोरी भरलीय; PM मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi Slams Congress and Bhupesh Baghel Government : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्ला चढवला.
PM Narendra Modi, Chhattisgarh elections
PM Narendra Modi, Chhattisgarh electionsSAAM TV
Published On

PM Modi Vs Bhupesh Bhagel :

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्ला चढवला. काँग्रेसने 'महादेव' नावालाही सोडलं नाही. अवैध सट्टेबाजीच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून आपल्या तिजोऱ्या भरल्या, असा गंभीर आरोप मोदींनी केला.

पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित केले. त्यांनी मुख्यमंत्री बघेल आणि काँग्रेसवर निशाणा साधला. छत्तीसगड भाजपच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. तुमचे स्वप्न साकार करणारा जाहीरनामा त्यांनी काल प्रसिद्ध केला. या 'संकल्प पत्रा'त छत्तीसगडमधील माता-भगिनी, येथील तरूण आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे, असे मोदी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असा भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. छत्तीसगडची निर्मिती भाजपने केली आणि भाजपच या राज्याला सावरेल अशी मी हमी देतो, असं पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले.

भाजपने संकल्प पत्र जाहीर केले असले तरी, त्याच्या समोर काँग्रेसच्या खोटेपणाचं आव्हानही आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्या तिजोरी भरणे, आपल्या लोकांना नोकऱ्यांची खैरात वाटणे, तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळू न देणे या सगळ्याला काँग्रेसचे प्राधान्य आहे. पीएससी घोटाळ्यात काँग्रेसने तेच केले, असे गंभीर आरोपही मोदींनी केले.

PM Narendra Modi, Chhattisgarh elections
MP Election Survey: मध्य प्रदेशात मतदानापूर्वी राजकीय गणित बदललं? नवीन सर्वेक्षणात भाजप-काँग्रेस, कोण आघाडीवर

काँग्रेस सरकारच्या तावडीतून छत्तीसगडला सुटका हवीये- मोदी

राज्यातील काँग्रेस सरकारवर मोदींनी टीकास्त्र डागलं. या सरकारच्या तावडीतून छत्तीसगडला सुटका हवी आहे. काँग्रेसने २ हजार कोटींचा दारू घोटाळा, ५०० कोटींचा सीमेंट घोटाळा, ५ हजार कोटींचा तांदूळ घोटाळा, १३०० कोटींचा घोटाळा, ७०० कोटींचा डीएमएफ घोटाळा केला आहे, असे आरोपही त्यांनी केले.

काँग्रेसने छत्तीसगडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही - मोदी

छत्तीसगडला लुटण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर अशा घोटाळा प्रकरणांची चौकशी केली जाईल असा शब्द मी तुम्हाला देतो. तुमच्याकडील पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकेल, असं मोदींनी सांगितलं.

छत्तीसगडमधील काँग्रेसच्या सरकारने महादेवच्या नावालाही सोडले नाही. दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये मोठी कारवाई झाली. पैशांचा मोठा ढीग सापडला. हा पैसा सट्टेबाजांचा आहे असं लोक सांगतात. छत्तीसगडच्या गरीब आणि तरूणांचा पैसा लुटलेला आहे. या पैशांतून काँग्रेसचे नेते आपली घरे भरतात, असे आरोपही पंतप्रधान मोदींनी केले.

PM Narendra Modi, Chhattisgarh elections
Maharashtra Lok Sabha: महायुतीची लोकसभेची रणनीती ठरली, आमदार-खासदारांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com