Delhi Unlock: बाजारपेठा उद्यापासून पूर्णपणे सुरु

दिल्लीतील बाजारपेठ रात्री 8 पर्यंत उघडण्यावरील बंदी आता संपणार आहे. पुढील आठवड्यापासून दिल्लीतील सर्व बाजारपेठा आणि मॉल्स सामान्य वेळेनुसार उघडता येणार आहे.
Delhi Unlock: बाजारपेठा उद्यापासून पूर्णपणे सुरु
Delhi Unlock: बाजारपेठा उद्यापासून पूर्णपणे सुरु Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : दिल्लीतील Delhi बाजारपेठ Markets रात्री 8 पर्यंत उघडण्यावरील बंदी आता संपणार आहे. पुढील आठवड्यापासून दिल्लीतील सर्व बाजारपेठा आणि मॉल्स Malls सामान्य वेळेनुसार उघडता येणार आहे. म्हणजेच बाजारात रात्री 8 नंतरही खरेदी करता येईल. मुख्यमंत्री CM अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांनी ट्विट केले आहे की, आतापर्यंत कोरोनामुळे Corona दिल्लीचे बाजार रात्री 8 पर्यंत उघडण्याची परवानगी दिली आहे.

आता दिल्लीतील कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येमुळे ही मुदत सोमवारपासून लागू करण्यात येणार आहे. आता बाजारपेठ त्यांच्या सामान्य वेळेनुसार उघडण्यास सक्षम असणार आहे. बाजारपेठ, मार्केट कॉम्प्लेक्स, मॉल्स सध्या दिल्लीत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत उघडत आहेत. परंतु, येत्या आठवड्यात सर्व बाजार सामान्य वेळेनुसार उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे. रेस्टॉरंट्स आणि बार देखील सामान्य वेळेनुसार उघडणार आहेत.

हे देखील पहा-

आत्तापर्यंत, 50 टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट्स सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उघडत आहेत, आणि 50 टक्के क्षमतेसह बार 12 ते रात्री 10 पर्यंत उघडत आहेत. डीडीएमएच्या आदेशानुसार, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये 50 टक्के आसन क्षमतेचा नियम लागू करण्यात येणार आहे. ते सामान्य वेळेनुसार उघडणार आहेत. अनलॉक दिल्लीमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत बाजारपेठ उघडण्याची मुदत आता काढली जाणार आहे. डीडीएमएने शनिवारी या संदर्भात आदेश जारी केला आहे.

डीडीएमएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अनलॉक प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सवलती 31 ऑगस्टपर्यंत लागू राहतील. डीडीएमएने आपल्या मागील आदेशात 9 ऑगस्टपासून सर्व अधिकृत साप्ताहिक बाजारपेठ उघडण्याची परवानगी सॆन्यात आली होती. सध्या, मेट्रो आणि बसमध्ये उभे राहण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि सर्व आसनांवर प्रवास करण्याची परवानगी कायम राहनार आहे. 100% आसन क्षमतेचा नियम अजूनही लागू आहे आणि मेट्रो आणि बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास आणखी देखील परवानगी दिली नाही.

Delhi Unlock: बाजारपेठा उद्यापासून पूर्णपणे सुरु
नक्की वाचा | मुंबईतल्या बाजारपेठा कश्या सुरू राहणार

सध्या शाळा आणि महाविद्यालये 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, दहावी ते बारावीचे विद्यार्थी कोरोनाचे नियम पाळत शाळेत त्यांना उपस्थितीत राहण्यास परवानगी आहे. मागील आदेशात असे म्हटले होते की, या वर्गांचे विद्यार्थी प्रवेश, समुपदेशन, मार्गदर्शन आणि बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षा संबंधित उपक्रमांसाठी शाळेत जाऊ शकणार आहेत. दिल्ली सरकारने तज्ञ समितीवर शाळा उघडण्याबाबत एसओपी तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे. तज्ञ समिती पुढील एक आठवड्यात दिल्ली सरकारला एसओपी सादर करणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com